शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

ताई, या डॉक्टरांवर तुझा भरोसा नाही का? प्राथमिक आरोग्य केंद्रांतील प्रसूतीचे प्रमाण नगण्य

By विजय सरवदे | Updated: November 3, 2023 16:28 IST

मागील सहा महिन्यांत आरोग्य केंद्रांतील प्रसूतीचे प्रमाण सरासरी ५ टक्के एवढे आहे.

छत्रपती संभाजीनगर : बालमृत्यू रोखण्यासाठी प्रत्येक गरोदर मातेची प्रसूती हॉस्पिटलमध्येच व्हावी, असा आग्रह महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचा आहे, तर दुसरीकडे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांत किमान २५ टक्के तरी प्रसूती व्हाव्यात, असे निर्देश जिल्हा आरोग्य विभागाला दिले आहेत. दरम्यान, अपुरे मनुष्यबळ व अन्य कारणांन्वये आरोग्य केंद्रांतील प्रसूतींचे प्रमाण मागील सहा महिन्यांत सरासरी ५ टक्के एवढ्यावरच थांबले आहे.

जिल्ह्यात ५१ प्राथमिक आरोग्य केंद्रे व २७९ उपकेंद्रे आरोग्य सेवा देतात. या आरोग्य केंद्रांत मागील सहा महिन्यांत नियमित तपासणीसाठी येणाऱ्या ४४ हजार ३५८ गरोदर मातांपैकी २ हजार २८१ प्रसूती झाल्या आहेत. मग, उर्वरित गरोदर महिलांची प्रसूती घरी झाली की खासगी रुग्णालयात, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी स्पष्ट केले की, नियमित तपासणीसाठी येणाऱ्या सर्वच गरोदर मातांची प्रसूती आरोग्य केंद्रांमध्येच व्हावी, हे अपेक्षित नाही. याच्या अनेक कारणांपैकी आरोग्य केंद्रांत प्रशिक्षित परिचारिकांची मोठी कमतरता आहे. पहिली प्रसूती असेल तर शक्यतो अशा महिलांना सरकारी रुग्णालयांकडे रेफर केले जाते. सीझर प्रसूतीचा इतिहास असलेल्या महिलांना सुसज्ज ऑपरेशन थिएटर, सहजपणे रक्ताची उपलब्धता असणाऱ्या हॉस्पिटलकडे रेफर केले जाते. थोड्याफार कार्यरत असलेल्या परिचारिकांकडे दैनंदिन ओपीडीशिवाय मिशन इंद्रधनुष्य, आयुष्मान भव उपक्रमांतर्गत तपासणी, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढणे, १८ वर्षे वयापुढील व त्याखालील मुलांची तपासणी या कामांचा भार आहे. यामुळे आरोग्य केंद्रांतील प्रसूतीचे प्रमाण कमी वाटते.

कोणत्या तालुक्यात किती प्रा. आरोग्य केंद्र?तालुका- प्रा. आरोग्य केंद्र- गरोदर महिला- आरोग्य केंद्रातील प्रसूतीछत्रपती संभाजीनगर - ६- ८०६६- १६८फुलंब्री - ५- २९५०- १४६सिल्लोड- ६- ५७९७- ६०७सोयगाव- ३- २१४५- ४५कन्नड- ९- ५९३२- ५७५खुलताबाद- ३- १९६९- १०९गंगापूर- ६- ६७५६- १५८वैजापूर- ६- ४८५१- २९७पैठण- ७- ५८९३- १६६

प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ ५ टक्के प्रसूतीमागील सहा महिन्यांत आरोग्य केंद्रांतील प्रसूतीचे प्रमाण सरासरी ५ टक्के एवढे आहे.

कारणे दोनचजिल्हा रुग्णालयाकडे रेफर : पहिली प्रसूती असेल किंवा सीझर झालेले असेल, तर अशा महिलांना सरकारी रुग्णालयांकडे रेफर केले जाते.खासगी रुग्णालयात १०२ क्रमांची रुग्णवाहिका मोफत सेवा देत असल्यामुळे बहुतांश कुटुंबे शहरातील खासगी रुग्णालयात प्रसूती पसंत करतात.

जिल्हा आरोग्य अधिकारी कोटआरोग्य केंद्रांमध्येच प्रसूती व्हावी, यासाठी आमचा आटोकाट प्रयत्न असतो. अपरिहार्य कारणास्तव गरोदर मातांना जिल्हा रुग्णालय अथवा घाटी हॉस्पिटलकडे संदर्भित केले जाते. सुरक्षित प्रसूतीसाठी ग्रामीण भागातील गरोदर मातांनी आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी प्राधान्य द्यावे.- डॉ. अभय धानोरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी.

टॅग्स :pregnant womanगर्भवती महिलाAurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदhospitalहॉस्पिटल