जिल्ह्यातील तहसीलदारांचे खाणपट्टयांना अभय
By Admin | Updated: September 24, 2014 00:44 IST2014-09-24T00:27:00+5:302014-09-24T00:44:54+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यातील ८७ दगड खदानींची मोजणी उपसंचालक भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय व औरंगाबाद पथकाने खदानीची तपासणी करुन संबधित खानपट्टाधारकांने केलेल्या

जिल्ह्यातील तहसीलदारांचे खाणपट्टयांना अभय
उस्मानाबाद : जिल्ह्यातील ८७ दगड खदानींची मोजणी उपसंचालक भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय व औरंगाबाद पथकाने खदानीची तपासणी करुन संबधित खानपट्टाधारकांने केलेल्या उत्खननाचा खदाननिहाय अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केला होता. त्यानंतर तो अहवाल संबधित तहसीलदारांना देऊन अवैध उत्खनन केलेल्या खानचालकांकडून दंड लावून वसूल करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर संबधित तहसीलदारांनी खानचालकावर ५४ कोटी ५३ लाखावर दंड लावला होता.मात्र प्रत्यक्षात केवळ ५ कोटी ५७ लाखावर रुपये वसूल केले असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अप्पर जिल्हाधिकारी वारंवार आदेश दिले होते. याबाबत मिळालेली माहिती अशी की, जिल्ह्यातील खदानींची तपासणी जून महिन्यात करण्यात आली होती.यात जिल्ह्यातील ८७ खदानींची मोजणी उपसंचालक भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय व औरंगाबाद पथकाने खदानीची तपासणी करुन संबधित खानपट्टाधारकांने केलेल्या उत्खननाचा खदाननिहाय अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केला होता. यात गौण गौण खनिज स्वामित्वधन भरणा केलेल्या प्रमाणात अधिक गौण उत्खनन खदानधारकाने विनापरवाना केल्याचे दिसून आले होते. याची पडताळणी करण्यासाठी संबधित तहसीलदाराना याचा अहवाल प्रशासनाच्या वतीने देण्यात आला होता. अहवालानुसार संबधित कालावधीत उत्खनन व संबधित कालावधीत भरलेले गौण खनिज स्वामित्वधन याची पडताळणी करुन उर्वरित गौण खनिज उत्खनन अवैध समजून कार्यवाही करुन याचा अहवाल संबधित तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे आदेश दिले होते. यात २३ वाळूघाट व ७४ खाणपट्टे चालकांकडून ५४ कोटी ५३ लाख ४६ हजार ८५६ रुपयांचे अवैध उत्खनन झाल्याचे तहसीलदारांनाच्या तपासणी मधुन समोर आले होते. मात्र प्रत्यक्ष आठ तालुक्यातील तहसीलदारांना केवळ संबधित खाननचालकाडून केवळ ५ कोटी ५७ लाखावर रुपये वसूल केले असल्याची माहिती समोर आली आहे. यातुन संबधित तहसीलदार वाळूघाट व खाणपट्टे चालकांना अभय देत आहे का असाच प्रश्न आता उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी) जिल्ह्यातील ५० खानपट्टया चालकांनी विना परवाना उत्खनन , दोन चालकांनी मुदत संपल्यानंतरही उत्खनन, करारनामा परवाना आदेशातील अटी व शर्तीच्या उल्लघनाबाबतची ५ प्रकरणे असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले. भूम , कळंब व उमरगा तहसीलदारांनी थोडीफार कार्यवाही करुन दंड वसूल केला तर उर्वरित तहसीलदारांनी कोणतीच कार्यवाही केलेली नाही हे विशेष. जिल्ह्यातील ८७ दगड खदानी चालकानी अवैध उत्खनन केलेल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला दोन महिन्याखाली उपसंचालक भूविज्ञान व खनिकरण संचलनालय यांनी दिला होता. कारवाई करून दंडाची रक्कम वसूल करण्याचे आदेश ११ जुलै रोजी दिले होते.