शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे काय होणार? आज ‘सर्वोच्च’ फैसला
2
२ मोठे नेते, २ दावे...राज्यात २ डिसेंबरनंतर राजकीय भूकंप?; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू
3
पहाटे ५ वाजता शिंदेसेनेच्या आमदाराच्या घरी १०० पोलिसांची धाड; घराची झाडाझडती, भाजपावर आरोप
4
महाराष्ट्रासह १० राज्यांतील मेडिकल कॉलेजांवर ईडीचे छापे; ३६ जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
5
राज-उद्धव ठाकरे भेट, ‘शिवतीर्थ’वर बंद दाराआड २ तास चर्चा; एकजुटीने महायुतीला थोपवण्याचा निर्णय?
6
इमारतींच्या छतांवर आणि महामार्गावर आता ‘नो होर्डिंग्ज; मुंबई महापालिकेचे जाहिरात धोरण जाहीर
7
दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना सवाल; "मृत्यूला ५ वर्ष झाली, आणखी किती..."
8
सिंधुदुर्गनंतर बदलापूरात पैसे वाटताना रंगेहाथ पकडले; महायुतीत शिंदेसेना-अजित पवार गटात जुंपली
9
श्रेयवाद, आरोप प्रत्यारोप अन् ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर; सत्ताधारी भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष वाढला
10
खराब हवेचे खापर इथिओपियातील ज्वालामुखीवर फोडू नका; प्रदूषणावरून हायकोर्टाने सरकारला सुनावले
11
गर्जेच्या शरीरावरही जखमा, संवादाचे रेकॉर्डिंग पोलिसांकडे; दाेन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी 
12
ठाण्याची झणझणीत मिसळ की पुण्याचे श्रीखंड; शंभराव्या मराठी साहित्य संमेलनासाठी रस्सीखेच?
13
१०० वर्षांनी पंचग्रही योग, २०२६ला ७ राशींची मनासारखी कमाई; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-लाभ भरभराट!
14
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
15
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
16
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
17
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
18
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
19
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
20
अरेच्चा! भारतीयांना 'हे' शब्द नीट उच्चारताच येत नाही; तुम्ही Croissant, Ghibli चा उच्चार चुकवता?
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचा-यांचे तहसीलदारांच्या विरोधातच आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 15:34 IST

तहसीलदार बालाजी शेवाळे यांच्या कार्यपद्धतीने होणा-या त्रासा विरोधात मानवत तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी एकवटले आहेत. सामूहिक रजा देत सर्व कर्माचा-यांनी  त्यांच्या बदलीसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

ठळक मुद्दे६  जुन रोजी याच कर्मचा-यांनी तहसीलदार शेवाळे यांच्या त्रासाला कंटाळून जिल्हाधिका-यां कडे सामूहिक रजा पाठवून दिल्या होत्या.याचा काही परिणाम न होता शेवाळे यांच्याकडून कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचा प्रकार सुरूच राहिला.तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी, मंडळ अधिकारी व तलाठी अशी २७  कर्मचारी सामूहिक रजेवर गेले आहेत.

मानवत (जि. परभणी ), दि. ३ :  तहसीलदार बालाजी शेवाळे यांच्या कार्यपद्धतीने होणा-या त्रासा विरोधात मानवत तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी एकवटले आहेत. सामूहिक रजा देत सर्व कर्माचा-यांनी  त्यांच्या बदलीसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.  या कर्मचा-यांनी सकाळपासूनच तहसील कार्यालयासमोर तंबू टाकत ठीया मांडला आहे. मानवत येथील तहसीलदार बालाजी शेवाळे गतवर्षी येथे रुजू झाले आहेत. सुरवातीच्या काही दिवसातच  कर्मचारी आणि त्यांच्यात प्रचंड बेबनाव सुरू झाला. कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देणे, वरिष्ठांना चुकीचा अहवाल पाठविण्याची धमकी देणे, नोटिसा बजावणे स्वरूपाच्या तक्रारी कर्मचाऱ्याकडून जिल्हाधिकारी यांनी करण्यात आल्या होत्या. 

६  जुन रोजी याच कर्मचा-यांनी तहसीलदार शेवाळे यांच्या त्रासाला कंटाळून जिल्हाधिका-यां कडे सामूहिक रजा पाठवून दिल्या होत्या. मात्र, त्या वेळी वरिष्ठ अधिका-यांकडून कर्मचाऱ्यांची समजूत काढण्यात आली होती. यानंतर उपजिल्हाधिकारी सि. एस. कोकणी यांनी कर्मचा-यांचे जवाब नोंदवून त्याचा अहवाल जिल्हाधिका-यांकडे पाठवला होता. याचा काही परिणाम न होता शेवाळे यांच्याकडून कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचा प्रकार सुरूच राहिला. यावर बुधवारी (दि.२ ) सर्व  कर्मचाऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी यांची भेट या प्रकरणी भेट घेतली. यावेळी त्यांनी एक दिवस थांबा असे सांगितले परंतु शेवाळे यांच्यावर कारवाई झाली नाही. यामुळे आज तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी, मंडळ अधिकारी व तलाठी अशी २७  कर्मचारी सामूहिक रजेवर गेले. अधिकाऱ्यांच्या विरोधात लोकप्रतिनिधी किंवा नागरिकांची आंदोलन होतात. अधिकारी विरुद्ध कर्मचारी अशा विरळच होणा-या आंदोलनाने मात्र नागरिकांचे  लक्ष वेधले आहे. 

तहसील ओस, काम ठप्पसामूहिक आंदोलन सुरू झाल्याने तहसील कार्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे.कर्मचारी नसल्याने कार्यालयाकडे कोणीच फिरकले नाही.  यामुळे कार्यालय ओस पडले आहे. 

वकील संघाचा पाठिंबासामूहिक रजा आंदोलन स्थळी वकील संघाच्या पदाधिकारी यांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला , तसा ठरावच वकील संघाने घेतला आहे.

चर्चा सुरू आहेहे आंदोलन कशा मुळे पेटले समजत नाही.  चूक असेल तर माघार घ्यायला तयार आहे. आपण कोणत्याही कर्मचाऱ्यांवर आरोप करू इच्छित नाही, त्याच्या सोबत चर्चा सुरु आहे- बालाजी शेवाळे, तहसीलदार