तहसीलवर हल्लाबोल मोर्चा
By Admin | Updated: August 7, 2014 01:26 IST2014-08-07T00:25:03+5:302014-08-07T01:26:35+5:30
पालम : तालुक्यातील दलितांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी दलित संघटनांच्या वतीने ६ आॅगस्ट रोजी दुपारी एक वाजता तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला आहे.

तहसीलवर हल्लाबोल मोर्चा
पालम : तालुक्यातील दलितांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी दलित संघटनांच्या वतीने ६ आॅगस्ट रोजी दुपारी एक वाजता तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला आहे.
शहरातील बौद्ध विहारापासून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली. शनिवार बाजार, फळा-फरकंडा रस्ता, मुख्य चौक, बसस्थानक परिसर, नवा मोंढा या भागातील हल्लाबोल मोर्चा काढून तहसील कार्यालयावर नेण्यात आला होता. या मोर्चात विजय वाकोडे, गौतम भालेराव, सुरेश गायकवाड, भैय्या भालेराव आदी सहभागी झाले होते.
पालम तालुक्यातील दलितांवर होणारा अत्याचार थांबवावा, अॅट्रॉसिटीच्या आरोपींना अटक करावी, गायरान जमिनी कसणाऱ्यांच्या नावाने करून देण्यात याव्यात, रमाई आवास योजनेतील घरकुलांचा प्रश्न मार्गी लावावा, संजय गांधी, श्रावणबाळ व इतर योजनेतील निराधारांचा प्रश्न तातडीने मार्गी लावून अनुदान वाटप करावे, अन्नसुरक्षा योजनेतील माल वेळेवर वाटप करावा यासह विविध न्याय मागण्यांसाठी हा हल्लाबोल मोर्चा काढण्यात तहसील कार्यालयावर काढण्यात आला होता.
तहसील कार्यालयासमोर मोर्चेकऱ्यांना विजय वाकोडे, गौतम भालेराव, सुरेश गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. तसेच दलितांचा प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही प्रशासनाला दिला आहे. तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करून मोर्चा मागे घेण्यात आला. या मोर्चात वैजनाथ हत्तीअंबिरे, संजय थिटे, निवृत्ती हत्तीअंबिरे, भीमशक्तीचे अरूण लहाने, राहुल गायकवाड, सुदर्शन हत्तीअंबिरे, बाबासाहेब एंगडे, काशिनाथ थिटे, अजय हनवते यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
घोषणाबाजींनी शहर दणाणले
विविध दलित संघटनेच्या वतीने पालम शहरात बुधवारी सकाळी हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. या घोषणाबाजीमुळे शहर दणाणून गेले. शहरातील मुख्य रस्त्यावरून घोषणा देत कार्यकर्ते तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी पोलिस प्रशासनाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.