तहसील एकीकडे तर ठाणे दुसऱ्या तालुक्यात

By Admin | Updated: July 18, 2014 01:50 IST2014-07-18T00:41:51+5:302014-07-18T01:50:37+5:30

एस़आऱमुळे , शिरूर अनंतपाळ तालुक्यातील त्या सहा गावांच्या ग्रामस्थांचा चौदा वर्षापासूनचा वनवास अद्यापही संपला नाही़

Tahasil on one side and Thane in the second taluka | तहसील एकीकडे तर ठाणे दुसऱ्या तालुक्यात

तहसील एकीकडे तर ठाणे दुसऱ्या तालुक्यात

एस़आऱमुळे , शिरूर अनंतपाळ
तालुक्यातील त्या सहा गावांच्या ग्रामस्थांचा चौदा वर्षापासूनचा वनवास अद्यापही संपला नाही़ तहसील कार्यालय एकीकडे तर पोलिस ठाणे दुसरीकडे असल्याने त्या गावकऱ्यांची ‘पायपीट’ कधी थांबणार? असा प्रश्न सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे़ छोट्या गोष्ठीसाठी मोठे रान उठविणारे नेते, कार्यकर्ते सर्वजणच दुर्लक्ष करीत असल्याने सामान्य नागरिकांचा वेळ, पैसा मात्र अनाठायी खर्च होत आहे़
शिरूर अनंतपाळ तालुक्याची निर्मिती जून १९९९ साली झाली़ त्यावेळी उदगीर तालुक्यातील दैैठणा, शेंद (उ़), कानेगाव, शेंद (प़), तिपराळ, शेंद (द़) ही सहा गावे शिरूर अनंतपाळशी जवळ असल्याने उदगीर तालुक्यातून शिरूर अनंतपाळ तालुक्यात समाविष्ट झाली़ तेव्हापासून या सहा गावांना तहसील कार्यालयासाठी शिरूर अनंतपाळ आणि पोलिस ठाण्यासाठी उदगीर, देवणी येथे जावे लागत असल्याने तालुका निर्मितीच्या चौदा वर्षानंतरही या गावांचा वनवास संपलेला नाही़
या सहापैैकी शेंद उत्तर, कानेगाव, शेंद दक्षिण, तिपराळ, शेंद पश्चिम या पाच गावांना देवणी पोलिस ठाण्यास जावे लागते़ तर दैैठणा गावास उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यास जावे लागते़ त्यामुळे सहा गावांची ‘पायपीट’ थांबणार कधी हा प्रश्न आजही अनुत्तरीतच आहे़
पोलिस ठाण्याच्या कामासाठी हाकेच्या अंरावरील शिरूर अनंतपाळ पोलिस हद्दीचे कारण सांगून हतबलता दाखवीतात़ त्यामुळे ४० कि़मी़चे अंतर कापत वेळ अन् पैैसा खर्च करावा लागतो़
म्हणे, प्रस्ताव मंत्रालयात पडून
याबाबत उपविभागीय पोलिस कार्यालयाशी संपर्क साधला असता सदरील सहा गावांना शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्यास जोडण्याबाबचा प्रस्ताव मंत्रालयाला पाठविला असल्याची माहिती अनेक दिवसापासून प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले़ प्रस्तावास मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे़

Web Title: Tahasil on one side and Thane in the second taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.