मनपातील कं त्राटदारांचा टाहो...!
By Admin | Updated: September 28, 2014 00:14 IST2014-09-28T00:14:46+5:302014-09-28T00:14:46+5:30
औरंगाबाद : महापालिकेतील एन-१ ची कामे करणाऱ्या किरकोळ कंत्राटदारांनी काम बंद करण्याचा इशारा दिला आहे.

मनपातील कं त्राटदारांचा टाहो...!
औरंगाबाद : महापालिकेतील एन-१ ची कामे करणाऱ्या किरकोळ कंत्राटदारांनी काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. पालिकेत ४०० हून अधिक कंत्राटदार ए-१ (एक लाखांच्या आतील कामे) या प्रकारातील कामे करतात. त्यांच्या कामांची बिले सहा-सहा महिन्यांपासून थकविली जात आहेत.
बड्या कंत्राटदारांची मनपाने मागील काही महिन्यांत कोट्यवधी रुपयांची बिले अदा केली. त्यामुळे लहान कंत्राटदारांना बिले देण्यासाठी पालिकेकडे सध्या तरी रक्कम नाही.
लेखा विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबर कंत्राटदारांची भांडणे होण्याच्या घटनाही या महिन्यात घडल्या आहेत.
त्यातच कंत्राटदारांचे ३२ कोटी रुपये थकित आहेत, ती रक्कम मिळावी, यासाठी कंत्राटदारांनी पालिकेकडे तगादा लावलेला असताना आयुक्त पी. एम. महाजन यांनी बिलांच्या सी. सी. तपासून अहवाल सादर करण्याचे आदेश लेखा विभागाला दिले आहेत.
सहा प्रभागांत सुरू असलेली कामे, थकित बिले व किती कामांची बिले दिली, याची माहिती अहवालात असणार आहे. दसरा, दिवाळी सणासाठी कंत्राटदारांना उसनवारी करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.
आजवर १२ कोटी रुपये एलबीटीतून जमा झाले आहेत. दरमहा १८ कोटी रुपये एलबीटीतून जमा होतात.
३१ आॅगस्टपर्यंत ३२ कोटी रुपये ठेकेदारांचे, तर सप्टेंबरमधील वेतन आणि कर्जहप्ते व समांतरची देणी मिळून ५६ कोटी रुपये मनपाला लागणार आहेत.