पोलिस अधिकाऱ्यांना जादुटोणाविरोधी कायद्याचे धडे

By Admin | Updated: November 25, 2015 00:18 IST2015-11-25T00:11:27+5:302015-11-25T00:18:57+5:30

जालना : जादूटोणा विरोधी कायद्याची जनजागृती करून त्याची कडक अमंलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे

Tactics of anti-magisterial law to police officers | पोलिस अधिकाऱ्यांना जादुटोणाविरोधी कायद्याचे धडे

पोलिस अधिकाऱ्यांना जादुटोणाविरोधी कायद्याचे धडे


जालना : जादूटोणा विरोधी कायद्याची जनजागृती करून त्याची कडक अमंलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक राष्ट्रीय संघटक प्रा़ श्याम मानव यांनी जादुटोणा विरोधी कायद्यासंदर्भांत पोलिस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना दिल्या़
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग समाजकल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने मंगळवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांसाठी जादुटोणा कायद्याच्या प्रभावी अमंलबजावणी साठी एक दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता़ यावेळी अनिसचे प्रा़ श्याम मानव राज्य समन्वय प्रवीण गांगुर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती़
यावेळी पोलिस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रा़ मानव यांनी जादुटोणो कायद्याची व्याख्याही कायद्याच्या अनुचितील १२ कलमे आणि पोट कलमे आहे़ ते सर्वांनी समजावून घेणे गरजेचे आहे़ त्या कलमात असलेली कृत्येच जादुटोणा विरोधी कायदा आहे़ हा कायदा न्या़ सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी प्रभावशाली करण्यात आला आहे़ यात दोष सिद्ध झाल्यास सहा महिने ते ७ वर्ष शिक्षा तसेच ५ हजार ते ५० हजार रूपयांपर्यंत दंड होवू शकतो़ तसेच हा गुन्हा करणारा जेवढा दोषी ठरतो तेवढाच त्याला अप्रत्येक्षपणे सहकार्य करणाराही दोषी ठरतो़ जादुटाणा विरोधी कायद्यातंर्गत आतापर्यंत १४० गुन्हे दाखल झालेली आहेत़ मात्र तांत्रिक त्रुटींमुळे त्यातील निम्मे गुन्हे न्यायालयात टिकणार नसल्याचे त्यांनी सांगितले़ यापूढे जादुटोणाविरोधी कायद्याची अमंलबजावणी कडक व्हावी म्हणून अशा गुन्ह्याचा तपास दक्षता अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे़
हे दक्षता अधिकारी त्या त्या पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक दर्जाचे अधिकारी असणार आहे़ तसेच मुख्य दक्षता अधिकारी म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहणार आहे़ कुणाची तक्रार नसताना सुद्धा दक्षता अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करण्याचे तसेच कोणतेही वॉरंट नसताना झडतीचे अधिकार देण्यात आले असल्याचे सांगून त्यांनी कायद्यातील सर्व १२ अधिनियमनांबाबत पोलिस अधिकाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करून त्याची अंमलबजावणी करण्याबाबत सूचना दिल्या़
यावेळी सहाय्यक पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, पोलिस उपअधीक्षक गृह मुकुंद आघाव, उपविभागीय अधिकारी तजस्वी सातपूते, इश्वर वसावे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी, सपोनि विनोद इज्जपवार, तालुका जालना पोलिस ठाण्याचे पो़नि़ भगीरथ देशमुख, सदर बाजारचे पो़ नि़ अनिल विभूते, जाफराबादचे पो़ नि़ पाटील, पो़नि़ विद्यानंद काळे यांच्यासह अंनिसचे जिल्हाध्यक्ष मिलिंद सांवत, सचिव पुष्पराज तायडे, संघटक सुनील वाघ आदींची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)

Web Title: Tactics of anti-magisterial law to police officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.