टी. एस. पाटील कालवश
By Admin | Updated: September 12, 2014 00:32 IST2014-09-12T00:14:44+5:302014-09-12T00:32:07+5:30
कन्नड : कन्नडचे माजी आमदार डॉ. टी. एस. पाटील (८२) यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले.

टी. एस. पाटील कालवश
कन्नड : कन्नडचे माजी आमदार डॉ. टी. एस. पाटील (८२) यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
डॉ. पाटील १९७८ साली समाजवादी पक्षाकडून आमदार झाले. याचवर्षी त्यांनी शहरात साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. १९७९ साली डॉ. राम मनोहर लोहिया मजूर संस्था आणि जयप्रकाश सहकारी ग्राहक संस्थेची स्थापना, १९९० पासून आदिम जाती सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष, १९९२ पासून जयप्रकाश सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अशी विविध पदे भूषविताना त्यांची मन ओढाळ पाखरू, तेजस्विनी, मैली गंगा, निखारा, अपुरी स्वप्ने, वाटा वेगवेगळ्या, उत्सव मस्ती, चेंज आदी पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
त्यांनी एम.जी.एम. हॉस्पिटलसाठी मरणोत्तर देहदान करण्याबाबत चिठ्ठी लिहून इच्छा व्यक्त केली होती. त्याप्रमाणे देहदान करण्यात आले. तत्पूर्वी त्यांच्या निवासस्थानी तहसीलदार महेश सुधळकर, उपविभागीय अधिकारी राजीव नंदकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रीतम यावलकर, पोनि सुभाष भुजंग, आ. हर्षवर्धन जाधव, माजी आ. नितीन पाटील, टी. एस. कदम, किशोर पाटील, उदयसिंग राजपूत, सुभाष पाटील, नगराध्यक्ष संतोष कोल्हे, वसंतराव पवार, पंडितराव वाळुंजे, प्राचार्य विजय भोसले, मुक्तारखान, बद्रीनाथ कतारे, अॅड. जाधव आदींनी अंत्यदर्शन घेतले.