भाजपाकडून काँग्रेस गटनेत्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा
By Admin | Updated: March 22, 2016 01:19 IST2016-03-22T00:26:54+5:302016-03-22T01:19:38+5:30
लातूर : लातूर शहरात सध्या तीव्र पाणीटंचाई असून मनपाच्या वतीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ पंधरा दिवसांतून एकदा टँकरने पाणीपुरवठा केला जातो़

भाजपाकडून काँग्रेस गटनेत्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा
लातूर : लातूर शहरात सध्या तीव्र पाणीटंचाई असून मनपाच्या वतीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ पंधरा दिवसांतून एकदा टँकरने पाणीपुरवठा केला जातो़ त्यात काँग्रेसच्या गटनेत्याने निवडणुकीतील राग मनात धरून विशिष्ट समाजातील नागरिकांनाच पाणी दिले नाही़ याच्या निषेधार्थ भाजपाकडून काँग्रेसचे गटनेते नरेंद्र अग्रवाल यांची सोमवारी प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली़ दरम्यान या प्रकरणी गांधी चौक पोलिसांत भाजपाच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे़
लातूर शहराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी मनपावर आहे़ पाणी वाटप करताना दुजाभाव न करणे क्रमप्राप्तच आहे़ मात्र सत्ताधारी काँग्रेसचे गटनेते नरेंद्र अग्रवाल यांनी मागील निवडणुकीचा राग मनात धरून काही लोकांना पाणी दिले नाही़ आपल्या जवळच्या मर्जितील लोकांनाच पाणी दिले़ लिंगायत समाजाच्या नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवले़ निवडून आल्यानंतर सर्व समाज लोकप्रतिनिधींसाठी सारखाच असतो़ मात्र ही बाब नरेंद्र अग्रवाल यांनी विसरून लिंगायत समाजाच्या लोकांना पाणी दिले नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला़ त्यामुळे भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांच्या सुचनेनुसार कार्यकर्त्यांनी नरेंद्र अग्रवाल यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली़ हनुमान चौक ते नरेंद्र अग्रवाल यांच्या घरापर्यंत काढण्यात आलेल्या या यात्रेत अनिल शिंदे, गीता गौड, ज्योती पांढरे, प्रवीण येळे, विवेक बाजपाई, शिवसिंह सिसोदिया, अनिल पतंगे, ललित तोष्णीवाल, राहूल पाटील, अजय दुडिले, जयश्री मोतीपवळे, कैलास काळे, हेमंत जाधव, मन्सूर खान, सुनील मलवाड आदी सहभागी झाले होते.