सय्यद अब्दुल्ला स्वत:हून ठाण्यात !
By Admin | Updated: August 15, 2014 01:35 IST2014-08-15T01:21:28+5:302014-08-15T01:35:59+5:30
बीड : उप मुख्य कार्यकारी अधिकारी़ आऱ आऱ भारती यांना धक्काबुक्की केल्याच्या प्रकरणात जि़ प़ अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता़ गुरुवारी सकाळी

सय्यद अब्दुल्ला स्वत:हून ठाण्यात !
बीड : उप मुख्य कार्यकारी अधिकारी़ आऱ आऱ भारती यांना धक्काबुक्की केल्याच्या प्रकरणात जि़ प़ अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता़ गुरुवारी सकाळी ११ वाजता ते स्वत:हून शिवाजीनगर ठाण्यात हजर झाले़
त्यानंतर पोलिसांनी अब्दुल्ला यांना ताब्यात घेतले़ त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न केले होते परंतु न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला होता़ गुरुवारी दुपारी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली़ त्यानंतर ते जामिनावर सुटले, अशी माहिती सहायक निरीक्षक पी़ डी़ गायकवाड यांनी दिली़ (प्रतिनिधी)