क्षुल्लक कारणावरून तलवारीने केला वार, एक जण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:05 IST2021-05-30T04:05:26+5:302021-05-30T04:05:26+5:30

पोलिसांकडून मिळालेल्या माहितानुसार, तालुक्यातील वाहेगाव येथील शाहरूख बागवान (२८) याने आपल्या घरासमोर झोपण्यासाठी पलंग टाकला होता. ते पाहून शेजारी ...

Sword struck for trivial reason, one seriously injured | क्षुल्लक कारणावरून तलवारीने केला वार, एक जण गंभीर जखमी

क्षुल्लक कारणावरून तलवारीने केला वार, एक जण गंभीर जखमी

पोलिसांकडून मिळालेल्या माहितानुसार, तालुक्यातील वाहेगाव येथील शाहरूख बागवान (२८) याने आपल्या घरासमोर झोपण्यासाठी पलंग टाकला होता. ते पाहून शेजारी असलेल्या संतोष गटकळ याने पलंग रस्त्यावर का टाकला, म्हणून विचारणा केली आणि रागाने रस्त्यावरील पलंग बाजूला फेकून दिला. यावरून वाद सुरू होताच, गटकळ याने शाहरूखच्या छातीवर व डाव्या हातावर धारदार तलवारीने वार केला. यात शाहरूख गंभीर जखमी झाला. याबाबत एमआयसीडी पैठण पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली, तर जखमीच्या भावाने त्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी जखमीचा भाऊ मंजूर बागवान यांच्या फिर्यादीवरून संतोष गटकळ याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार राजू जावळे, विजय मोरे, खंडू मचरे हे करीत आहेत.

Web Title: Sword struck for trivial reason, one seriously injured