पैशावरून एकावर तलवारीने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:49 IST2017-09-13T00:49:26+5:302017-09-13T00:49:26+5:30

शेळ्या घेण्यास दिलेले पैसे वेळेवर परत न दिल्याने एकावर पाच जणांनी तलवारीने वार केल्याची घटना तालुक्यातील जळगाव- चकलांबा रस्त्यावर सोमवारी सकाळी घडली

sword attack on one person | पैशावरून एकावर तलवारीने वार

पैशावरून एकावर तलवारीने वार

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शेळ्या घेण्यास दिलेले पैसे वेळेवर परत न दिल्याने एकावर पाच जणांनी तलवारीने वार केल्याची घटना तालुक्यातील जळगाव- चकलांबा रस्त्यावर सोमवारी सकाळी घडलीÞ. हल्यातील जखमीवर औरंगाबाद येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात ग्रा.पं.च्या दोन सदस्यांसह अन्य तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
तालुक्यातील चकलांबा येथील राधेशाम विश्वनाथ जाधव यांनी दोन दिवसापुर्वी ग्रामपंचायत सदस्य सुभाष रंगनाथ गुंजाळ यांच्याकडून शेळ्या खरेदी केल्या होत्या. दोन दिवसानंतर सदरील शेळ्या घेतलेले पैसे परत देण्याचा वादा करण्यात आला होता. मात्र ठरल्याप्रमाणे राधेशाम विश्वनाथ जाधव यांनी सुभाष रंगनाथ गुंजाळ यांचे पैसे परत दिले नाहीत. याचा राग मनात धरून सुभाष गुंजाळ यांनी ग्रामपंचायत सदस्य अशोक दादाभाऊ खेडकर, भैय्या (मंत्री) भोसले, तुकाराम माळी व अन्य एक जणाला सोबत घेऊन सोमवारी सकाळी राधेशाम सखाराम जाधव यांच्यावर तलवार व अन्य धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये राधेशाम जाधव गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर औरंगाबाद येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या प्रकरणी राधेशाम विश्वनाथ जाधव यांच्या फिर्यादीवरून चकलांबा ग्रामपंचायत सदस्य अशोक दादाभाऊ खेडकर, ग्रामपंचायत सदस्य सुभाष रंगनाथ गुंजाळ, भैय्या (मंत्री) भोसले, तुकाराम माळी व अन्य एक अशा पाच जणांविरूध्द चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: sword attack on one person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.