तलवार, कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला
By Admin | Updated: May 12, 2017 00:23 IST2017-05-12T00:21:16+5:302017-05-12T00:23:43+5:30
उमरगा : शेताच्या बांधावरील बाभळीचे झाड तोडण्याच्या कारणावरून एकास तलवार, कुऱ्हाड, लाकूड, सळईने जबर मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले़

तलवार, कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरगा : शेताच्या बांधावरील बाभळीचे झाड तोडण्याच्या कारणावरून एकास तलवार, कुऱ्हाड, लाकूड, सळईने जबर मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले़ ही घटना गुरूवारी सकाळी उमरगा तालुक्यातील गुगळगाव शिवारात घडली़ या प्रकरणी उमरगा ठाण्यात आठ जणांविरूध्द गुन्हा नोंद झाला.
गुगळगाव येथील रमेश दिगंबर भोसले, मुलगा संदिपान भोसले व मेहुणा भागवत गायकवाड हे गुरुवारी सकाळी शेतातील बांधावरील बाभळीचे झाड तोडण्यासाठी मजूर घेऊन गेले होते़ त्यावेळी त्यांच्या भावकितील काही लोक तेथे आले़ झाड तोडण्याच्या कारणावरून शिवीगाळ करीत तलवार, कुऱ्हाड, कोयता, लाकूड, सळईने त्यांच्या डोक्यावर, हाताच्या दंडावर, अंगठयावर, पायावर वार करुन जखमी केले. या मारहाणीत रमेश भोसले यांच्या हाताचा आंगठा तुटला़ तर तिघेही जबर जखमी झाले़ मारहाणीतील जखमींना उपचारासाठी उमरगा शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले़ जखमी रमेश भोसले यांच्या फिर्यादीवरून दगडु भोसले, कविता भोसले, दादाराव भोसले व त्यांचे दोन भाच्चे, धोंडाबाई भोसले, बापू भोसले, रुक्मीनबाई भोसले (सर्व रा. वागदरी ता. उमरगा) यांच्याविरूध्द उमरगा ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.