आरोग्य अधिकाऱ्यास शिवीगाळ
By Admin | Updated: October 29, 2014 00:44 IST2014-10-29T00:33:30+5:302014-10-29T00:44:26+5:30
उस्मानाबाद : जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यास शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ढोकी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांविरूध्द शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला

आरोग्य अधिकाऱ्यास शिवीगाळ
उस्मानाबाद : जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यास शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ढोकी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांविरूध्द शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना मंगळवारी सकाळी जिल्हा परिषदेतील आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयात घडली़
पोलिसांनी सांगितले की, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ शिवाजी संगाप्पा फुलारी हे मंगळवारी दुपारी कार्यालयात कामकाज करीत होते़ त्यावेळी तेथे आलेल्या ढोकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ़ तानाजी ज्ञानोबा लाकाळ यांनी अनधिकृत काम करण्यासाठी दबाव टाकत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद डॉ़ फुलारी यांनी उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात दिली़ डॉ़ फुलारी यांच्या फिर्यादीवरून याप्रकरणी डॉ़ लाकाळ यांच्याविरूध्द शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ तपास फौजदार शहाणे करीत आहेत़