स्टेट बँक कॉलनीत पसरतोय स्वाईन फ्लू
By Admin | Updated: June 26, 2017 00:15 IST2017-06-26T00:06:17+5:302017-06-26T00:15:17+5:30
राजापेठ परिसरातील स्टेट बँक कॉलनीला हळूहळू स्वाईन फ्लूचा फास आवळू लागला आहे.

स्टेट बँक कॉलनीत पसरतोय स्वाईन फ्लू
लोकमत न्यूज नेटवर्क
नवीन नांदेड: सिडको भागातील संभाजी चौक - डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चौक या रस्त्याच्या भूमिपूजनाची वर्षपूर्ती झाली असून रस्त्याच्या एका बाजूच्या कामाला मात्र अद्यापही मुहूर्त मिळाला नाही़
नवीन नांदेड भागाला जोडणाऱ्या डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चौक - संभाजी चौक रस्त्यासाठी सिडकोवासियांनी अनेकवेळा आंदोलने केली़ सत्ताधारी काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांचा या आंदोलनात सहभाग होता़ गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता करण्याची मागणी होत होती़ जवळपास एक लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या भागातून दररोज हजारो नागरिक याच रस्त्याने प्रवास करतात़ त्याचबरोबर प्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालयही याच परिसरात आहे़
त्यानंतर मनपाकडून या रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली़ वर्षभरापूर्वी मोठ्या थाटामाटात उद्घाटनाचे सोपस्कारही पूर्ण करण्यात आले़ त्यामध्ये श्रेयावरुन सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत होते़ उद्घाटनानंतर काही महिन्यांनी रस्त्याच्या एका बाजूचे काम पूर्ण करण्यात आले़ परंतु दुसऱ्या बाजूच्या कामास मात्र अद्यापही सुरुवात करण्यात आली नाही़ त्यात धनेगाव चौकातून डेअरी मार्गे आंबेडकर चौकाकडे येणाऱ्या रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे दोन महिन्यांपासून या मार्गावरील सर्व वाहतूक चंदासिंग कॉर्नर, एमआयडीसी, रमामाता आंबेडकर चौक, संभाजी चौक मार्गे आंबेडकर चौकात येत आहे़ त्यामुळे या रस्त्यावरील रहदारी वाढली आहे़ त्यात नवीन केलेल्या रस्त्यावरही खड्डे पडले आहेत़ तर या रस्त्याची एक बाजू बंदच असल्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे़ रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस कधी मुहूर्त मिळेल याची प्रतीक्षा आता रहिवासी करीत आहेत़