मंत्र्यांकडून स्वाईन फ्लूचा आढावा

By Admin | Updated: February 14, 2015 00:13 IST2015-02-14T00:05:00+5:302015-02-14T00:13:07+5:30

औरंगाबाद : राज्यात स्वाईन फ्लूची साथ झपाट्याने पसरत असल्याने राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शुक्रवारी आरोग्य विभागाची बैठक घेऊन स्वाईन फ्लूबाबत आढावा घेतला.

Swine Flu Review by Ministers | मंत्र्यांकडून स्वाईन फ्लूचा आढावा

मंत्र्यांकडून स्वाईन फ्लूचा आढावा

औरंगाबाद : राज्यात स्वाईन फ्लूची साथ झपाट्याने पसरत असल्याने राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शुक्रवारी आरोग्य विभागाची बैठक घेऊन स्वाईन फ्लूबाबत आढावा घेतला.
कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात झालेल्या आढावा बैठकीला आरोग्य उपसंचालक डॉ.रविकिरण चव्हाण, सिव्हिल सर्जन डॉ. जी. एम. गायकवाड यांच्यासह जालना, परभणी, हिंगोली, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांच्या सिव्हिल सर्जन्सची उपस्थिती होती.
याप्रसंगी डॉ. सावंत यांनी प्रत्येक जिल्ह्यातील स्वाईन फ्लू, क्षयरोग, कुष्ठरोग, पाणी नमुने तपासणी, मलेरिया, औषधांची उपलब्धता याबाबत आढावा घेतला. तसेच आरोग्य विभागातील भरलेली पदे आणि रिक्त पदे याबाबतची माहिती जाणून घेतली. स्वाईन फ्लू आजाराबाबत जनतेत दहशत निर्माण होऊ नये, यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले. स्वाईन फ्लूची मुबलक औषधी, मास्क उपलब्ध करण्याचे आदेश त्यांनी दिले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जनतेशी सौहार्द व्यवहार ठेवावा आणि वेळेत उपचार करावे, अशी सूचना केली.

Web Title: Swine Flu Review by Ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.