शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सरावासाठी रात्री गोदावरी पोहून जाण्याचे चीज झाले; कुस्तीपटू सोनालीची 'खेलो इंडिया'साठी निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 19:35 IST

गावातील प्रतिष्ठितांपासून ते रिकामटेकड्यांचा कुस्ती खेळणारी मुलगी म्हणजे चेष्टेचा विषय ठरत असे.

पैठण : हरियाणा येथे आयोजित ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी रेसलिंग फ्री स्टाईल महिला चॅम्पियनशिप स्पर्धेत पैठणची लेक सोनाली गिरगे हिने झेंडा फडकावला आहे. या विजयानंतर सोनालीची एप्रिल महिन्यात होणाऱ्या खेलो इंडिया ऑर्गनायझेशन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पैठण तालुक्यातील नायगाव या छोट्याशा गावातील सोनालीने राष्ट्रीय पातळीवर नाव कमावल्याने तिच्याकडून कुस्तीक्षेत्राच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

१४ ते १६ मार्चदरम्यान चौधरी बन्सीलाल युनिव्हर्सिटीच्या (भिवानी, हरियाणा) वतीने राष्ट्रीय पातळीवरील महिला कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून पैठण येथील ताराई महाविद्यालयाची विद्यार्थिनी सोनाली दीपक गिरगे या स्पर्धेत उतरली होती. ५० किलो वजनी गटात १३२ महिला कुस्तीपटूंत तिने चौथा क्रमांक पटकावत खेलो इंडिया ऑर्गनायझेशन स्पर्धेत प्रवेश मिळविला आहे.जालना येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत ५० किलो गटात विजेतेपद पटकावून सोनालीने हरियाणातील स्पर्धेत प्रवेश मिळविला होता. याबाबत ‘लोकमत’ने तिच्या कर्तृत्वाला वाव देणारे वृत्त प्रकाशित केले होते. ग्रामीण भागात मुलीने कुस्ती खेळणे म्हणजे मोठे धाडसाचे काम होते.

गावातील प्रतिष्ठितांपासून ते रिकामटेकड्यांचा कुस्ती खेळणारी मुलगी म्हणजे चेष्टेचा विषय ठरत असे. यामुळे सोनालीचे वडील दीपक गिरगे यांच्यावर मोठा सामाजिक दबाव यायचा. अशा प्रतिकूल परिस्थितीत समाजाची पर्वा न करता ते आपल्या मुलीच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. आणि सोनालीच्या कुस्तीच्या कारकिर्दिला प्रारंभ झाला. गावात मातीत कुस्तीचा सराव करणाऱ्या सोनालीने प्रतिकूल वातावरण, सुविधांचा अभाव असताना अपूर्व इच्छाशक्तीवर केलेली आगेकूच राज्यातील लेकींसाठी मोठी प्रेरणादायी ठरणार आहे.

रात्रीच्या अंधारात गोदावरीतून पोहून जात होती सरावालासोनालीचे गाव नायगाव हे गोदावरीच्या एका काठावर तर सरावासाठी दुसऱ्या काठावरील मुंगी (ता. शेवगाव) येथे जावे लागत होते. रात्री परत येताना होडी नसायची तेव्हा गोदावरीच्या पाण्यात उडी मारून गावाचा किनारा गाठावा लागत होता. समाज काय म्हणेल याची पर्वा न करता मी लेकीच्या पाठीशी उभा राहिलो. तिने बापाचे नाव कमावले, असे सांगताना दीपक गिरगे यांचे डोळे पानावले.

टॅग्स :Wrestlingकुस्तीAurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद