जाहीरनाम्यातून स्वप्नरंजन

By Admin | Updated: October 12, 2014 00:46 IST2014-10-12T00:37:33+5:302014-10-12T00:46:43+5:30

गंगाराम आढाव ,जालना विधानसभा निवडणुकीतील काही प्रमुख राजकीय पक्षांनी आपल्या जाहीर नाम्यात विकासाचे मद्दे आणि आश्वासनाची खैरात केलेली आहे. त्यामुळे मतदारांचे स्वप्नरंजन होत आहे.

Swarupanjan from Declaration | जाहीरनाम्यातून स्वप्नरंजन

जाहीरनाम्यातून स्वप्नरंजन


गंगाराम आढाव ,जालना
विधानसभा निवडणुकीतील काही प्रमुख राजकीय पक्षांनी आपल्या जाहीर नाम्यात विकासाचे मद्दे आणि आश्वासनाची खैरात केलेली आहे. त्यामुळे मतदारांचे स्वप्नरंजन होत आहे.
जालना विधानसभा मतदार संघात निवडणूक लढतीचे चित्र आता रंगतदार झाले आहे. आता पर्यंत विकास कामांवर आणि आरोप प्रत्यारोपांवर भर देणारे उमेदवार आता आपल्या पक्षाने जाहीर केलेला जाहीरनामा मतदारांसाठी कसा चांगला आहे हेच पटवून देवून त्याची अमंलबजावनी करण्यासाठी पक्षाला बहुमताने निवडून देण्याचे आवाहन करीत आहे.
काही उमेदवार पक्षाच्या जाहीरनाम्यापेक्षा स्वत: मतदार संघात केलेल्या विकास कामाचाच पाढा मतदारांपुढे वाचत आहे. जालना मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा आढावा असलेली पुस्तिका जाहीर करून सर्वात पुढे आहे, मतदार संघ माझा हे मतदारांना पटवून देवून विकासकामांच्या जोरावर मते मागीत आहे. सेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर यांनी काढलेल्या वचननाम्यात सेवा सुरक्षा, विकास हाच शिवसेनेचा ध्यास असल्याचे नमुद करून १९९० मध्ये निवडून आल्यानंतर केलेल्या विकास कामांचा मागोवा मतदारांना पटवून देवून पुढे काय विकास कामे करणार याचे वचन देतांनाच आघाडी सरकाने केलेल्या विविध घोटाळ्याचांही आरोप करून सेवा, सुरक्षा व विकासासाठी मत मागीत आहे.
भाजापाचे उमेदवार अरविंद चव्हाण हे जाहीरनाम्यातील व्हीजन डॉक्यूमेंटच्या माध्यमातून कसा विकास करणार व काय काय करणार हे पटूवन देतांनाच केंद्राप्रमाणे राज्यात एकहाती सत्ता देण्यासाठी मतदान मागत आहे. मनसेचे उमेदवार रवि राऊत यांनीही मनसेच्या जाहीरनाम्या पाठोपाठच आपण नवा चेहरा असल्याचे सांगत मते मागत आहे.
एकूणच सर्वच उमेदवार आप- आपल्या परीने मतांचा जोगवा मागून मतदारांचे स्वप्नरंजन करत आहे. त्यामुळे कुणाच्या स्वप्नाला मतदार जोगवारूपातून किती मते देवून कोणाचा उदो.. उदो करतात हे मतमोजनीनंतरच स्पष्ट होणार आहे.

Web Title: Swarupanjan from Declaration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.