स्वारातीम विद्यापीठ सिनेट निवडणूक कार्यक्रम जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:38 IST2017-09-29T00:38:50+5:302017-09-29T00:38:50+5:30
स्वारातीम विद्यापीठाने अधिसभा गठीत करण्यासाठी नोंदणीकृत पदवीधरांच्या पदवीधर मतदार संघातून दहा प्रतिनिधींची २९ आॅक्टोबर रोजी निवडणूक घेण्याचे निश्चित केले असून निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे विद्यापीठाने जाहीर केला आहे.

स्वारातीम विद्यापीठ सिनेट निवडणूक कार्यक्रम जाहीर
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : स्वारातीम विद्यापीठाने अधिसभा गठीत करण्यासाठी नोंदणीकृत पदवीधरांच्या पदवीधर मतदार संघातून दहा प्रतिनिधींची २९ आॅक्टोबर रोजी निवडणूक घेण्याचे निश्चित केले असून निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे विद्यापीठाने जाहीर केला आहे.
१ ते ५ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत नामनिर्देशन अर्ज सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. अर्जाची छाननी ६ आॅक्टोबर रोजी होणार आहे. ७ ते १० आॅक्टोबर या दरम्यान सायंकाळी ५ वाजेपर्यंत नामांकन परत घेता येतील. ११ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत कुलगुरुंकडे नामनिर्देशनावर अपील करता येईल़ १२ आॅक्टोबर रोजी कुलगुरू अपिलावर निर्णय देणार आहेत. १४ आॅक्टोबर रोजी निवडणूक लढविणाºया उमेदवारांची यादी विद्यापीठ जाहीर करणार आहे. २९ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान पार पडणार आहे. ३१ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होऊन मतमोजणीनंतर निकाल जाहीर होणार आहे, असे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. रमजान मुलानी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.