स्वामी विवेकानंद अकॅडमी विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 00:19 IST2017-12-31T00:18:58+5:302017-12-31T00:19:04+5:30
जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित आंतरशालेय गादिया चषक क्रिकेट स्पर्धेत स्वामी विवेकानंद अकॅडमीने चाटे स्कूल संघावर ९ गडी राखून मात केली. अष्टपैलू कामगिरी करणारा ओमकार शिंदे सामनावीर ठरला.

स्वामी विवेकानंद अकॅडमी विजयी
औरंगाबाद : जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित आंतरशालेय गादिया चषक क्रिकेट स्पर्धेत स्वामी विवेकानंद अकॅडमीने चाटे स्कूल संघावर ९ गडी राखून मात केली. अष्टपैलू कामगिरी करणारा ओमकार शिंदे सामनावीर ठरला.
चाटे स्कूलने प्रथम फलंदाजी करताना १३.३ षटकांत सर्वबाद ६७ धावा केल्या. त्यांच्याकडून आदित्य घोडके (१२ धावा) हाच दुहेरी आकडी धावसंख्या काढू शकला. त्यांना ३४ धावा या अवांतर स्वरूपात मिळाल्या. स्वामी विवेकानंद अकॅडमीकडून रोहित बनसोडे, ओमकार शिंदे, यश गाजरे, घनश्याम सोनवणे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात स्वामी विवेकानंद अकॅडमीने विजयी लक्ष्य ८ षटकांत १ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून ओमकार शिंदेने १७ चेंडूंत २६ व वैभव मातेरेने २२ चेंडूंत २२ धावा केल्या. आनंद साळवेने ३ धावा काढल्या. चाटे स्कूलकडून आदित्य घोडके याने १० धावांत १ गडी बाद केला.