रेल्वेखाली तरूणाचा संशयास्पद मृत्यू
By Admin | Updated: May 11, 2015 00:30 IST2015-05-11T00:15:00+5:302015-05-11T00:30:09+5:30
परतूर : शहरातील गुंज शाळेजवळ राहुल रामराव खैरे (वय २०) या तरूणाचा रविवारी रेल्वेखाली सापडून मृत्यू झाला. राहुल याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

रेल्वेखाली तरूणाचा संशयास्पद मृत्यू
परतूर : शहरातील गुंज शाळेजवळ राहुल रामराव खैरे (वय २०) या तरूणाचा रविवारी रेल्वेखाली सापडून मृत्यू झाला. राहुल याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, शवविच्छेदनास चार तासांचा विलंब लागल्याने मयताच्या नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयासमोर ठिय्या दिला. राहुलच्या मोठ्या भावाचे लॉन्ड्रीचे दुकान आहे. ९ मे रोजी रात्री ९.३० वाजता राहुल हा दुकानामध्ये झोपण्यासाठी गेला होता. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी ८ वाजता वखार महामंडळाजवळील रेल्वेपटरीवर राहुलचा मृतदेह आढळून आला. राहुलने आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिस उपनिरीक्षक आनंद बनसोडे यांनी व्यक्त केला. दरम्यान, शवविच्छेदनासाठी सकाळी ९ वाजेपासून ग्रामीण रूग्णालयात मृतदेह आणला होता. मात्र सायंकाळी ५ वाजेपर्यंत शवविच्छेदन झालेले नव्हते. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यास पाचारण करण्यात येऊन शवविच्छेदन करण्यात आले. (वार्ताहर)