‘तेरणा’च्या कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू

By Admin | Updated: September 15, 2014 00:26 IST2014-09-15T00:20:21+5:302014-09-15T00:26:17+5:30

उस्मानाबाद : तालुक्यातील ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्यात कार्यरत असलेल्या धनराज घुगे यांनी आत्महत्या केली नसून, त्यांचा खून झाला आहे.

Suspicious death of employee of 'Tyar' | ‘तेरणा’च्या कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू

‘तेरणा’च्या कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू

उस्मानाबाद : तालुक्यातील ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्यात कार्यरत असलेल्या धनराज घुगे यांनी आत्महत्या केली नसून, त्यांचा खून झाला आहे. या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका मयत धनराज घुगे यांच्या पत्नीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे केली आहे.
याबाबत याचिकाकर्त्याचे वकील अशिष जाधवर यांनी सांगितले की, मयत धनराज घुगे हे संबंधित कारखान्यात होत असलेल्या भंगार व यंत्र सामग्री चोरी प्रकरणी पोलिसांना खरी माहिती पुरवतील, या भीतीपोटी त्यांचा नियोजनबध्द खून करण्यात आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. तेरणा कारखान्यावर असलेल्या उच्च राजकीय हस्तक्षेपामुळे सदरील गुन्ह्याचा तपास करण्यात स्थानिक पोलिसांनी कुचराई केल्याचे सांगत त्यामुळे या गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे सुपूर्द करावा, अशी मागणीही यात करण्यात आल्याचे अ‍ॅड. जाधवर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या याचिकेची सुनावणी न्या. एस. एस. शिंदे व न्या. व्ही. एल. अचलिया यांच्या खंडपीठापुढे झाली असून, सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी म्हणणे सादर करण्यासाठी अवधी मागून घेतला आहे. तसेच पुढील सुनावणीला सदर गुन्ह्यातील तपास अधिकाऱ्यांना न्यायालयासमोर हजर करण्याचे अश्वस्त केले. यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणी २२ सप्टेंबर रोजी ठेवली असल्याचे अ‍ॅड. जाधवर यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Suspicious death of employee of 'Tyar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.