पैठण येथील वाळूपट्टा उत्खननास स्थगिती

By Admin | Updated: May 8, 2016 01:08 IST2016-05-08T00:59:33+5:302016-05-08T01:08:23+5:30

औरंगाबाद : पैठण तालुक्यातील वाळू उपशाला न्या. संजय गंगापूरवाला व न्या. के. के. सोनवणे यांनी दहा दिवसांची स्थगिती दिली आहे.

Suspension of the idol of excavation at Paithan | पैठण येथील वाळूपट्टा उत्खननास स्थगिती

पैठण येथील वाळूपट्टा उत्खननास स्थगिती

औरंगाबाद : पैठण तालुक्यातील वाळू उपशाला न्या. संजय गंगापूरवाला व न्या. के. के. सोनवणे यांनी दहा दिवसांची स्थगिती दिली आहे. यासंबंधी मुंबईमधील मंत्रालयातील संबंधित मंत्र्यांच्या अखत्यारीत असलेल्या समितीसमोर हजर होऊन वाळूपट्ट्यासंबंधी परवानगी घेण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत.
वैजापूर तालुक्यातील जळगाव व शहजतपूर येथील २०१३ च्या वाळू उत्खननाच्या परवानगीची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाने २०१६ मध्ये केली. वर्ष संपल्यानंतर संबंधित वाळूपट्टा उपशाची फेरपरवानगी मंत्र्यांकडून घ्यावी लागते; परंतु वैजापूर तालुक्यातील वाळूपट्टा उपशाची परवानगी मंत्र्यांनी देणे गरजेचे असताना संबंधित पट्ट्याची परवानगी दिली नाही. पैठण तालुक्यातील आवडे उंचेगाव वाळूपट्ट्याची परवानगी जिल्हा प्रशासनाकडून सर्व नियम धाब्यावर बसवून देण्यात आली. याविरोधात खंडपीठात याचिका दाखल केली.
रावसाहेब मोहन टेके (रा. शिवपूर, ता. गंगापूर) यांना वैजापूर तालुक्यातील जळगाव वाळूपट्टा उपशाचा ठेका देण्यात आला होता. त्यांना ३१ नोव्हेंबर २०११ मध्ये ४,९४७ ब्रास उत्खननाची परवानगी देण्यात आली होती. परंतु संबंधित ठेकेदाराने एक हजार ब्रास वाळूचा जास्तीचा उपसा केल्याने त्यांना ३२ लाख रुपये दंड आकारण्यात आला होता. याविरुद्ध त्यांनी खंडपीठात दाद मागितली होती. खंडपीठाने समिती नेमून अहवाल मागविला होता. नंतर याचिकाकर्ते विष्णू विठ्ठलराव मसुरे यांनी मंत्र्यांकडे दाद मागितली असता मंत्र्यांनी टेके यांचा दंड माफ करून उर्वरित वाळू उपशास परवानगी दिली होती. संबंधित वाळूपट्ट्याची परवानगी देण्याचे अधिकार मंत्र्यांना असताना टेके यांना जिल्हा प्रशासनाने मंत्र्यांचे अधिकार वापरून परवानगी दिली आणि परवानगीही वैजापूर तालुक्यातील पट्ट्याची न देता पैठण तालुक्यातील आवडे उंचेगावचा ठेका देण्यात आला. याविरोधात अ‍ॅड. संभाजी टोपे यांच्या वतीने खंडपीठात आव्हान देण्यात आले. शासनातर्फे अ‍ॅड. बी. ए. शिंदे तर प्रतिवादीतर्फे अ‍ॅड. आर. व्ही. गोरे यांनी काम पाहिले.

Web Title: Suspension of the idol of excavation at Paithan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.