आडळकर यांच्या अपात्रतेला स्थगिती

By Admin | Updated: May 9, 2014 00:39 IST2014-05-09T00:37:07+5:302014-05-09T00:39:35+5:30

सेलू : नगराध्यक्ष पवन हेमंतराव आडळकर यांना अपात्र ठरविले होते़ नंतर नगर विकास विभागाच्या अवर सचिव प्ऱ कि़ मंगुडकर यांनी ८ मे रोजी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली आहे़

Suspension of Adalakar disqualification | आडळकर यांच्या अपात्रतेला स्थगिती

आडळकर यांच्या अपात्रतेला स्थगिती

सेलू : नगराध्यक्ष पवन हेमंतराव आडळकर यांना नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सदस्यत्वासाठीचा नामनिर्देशन अर्ज दाखल करताना वयाचे २१ वर्ष पूर्ण झालेली नसल्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी यांनी २९ एप्रिल रोजी एका आदेशान्वये त्यांचे सदस्यत्व अपात्र ठरविले होते़ या निर्णयाविरूद्ध पवन आडळकर यांनी नगरविकास विभागाकडे दाद मागितली होती़ त्यानंतर नगर विकास विभागाच्या अवर सचिव प्ऱ कि़ मंगुडकर यांनी ८ मे रोजी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली आहे़ त्यामुळे नगराध्यक्ष पवन आडळकर यांचे सदस्यत्वासह नगराध्यक्षपदही तात्पुरते कायम राहिले आहे़ माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी पवन आडळकर यांच्या सदस्यत्वाला निवडणुकीतील वयाच्या कारणावरून विरोध दर्शवित जिल्हाधिकार्‍यांकडे २३ जानेवारी २०१३ रोजी रितसर याचिका सादर केली होती़ त्यानंतर जिल्हाधिकारी एस़ पी़ सिंह यांनी नगराध्यक्ष पवन आडळकर यांचे वयाच्या कारणावरून २९ एप्रिल रोजी सदस्यत्व अपात्र केले होते़ त्यानंतर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला होता़ नगराध्यक्ष पवन आडळकर यांनी अपात्रतेला स्थगिती मिळावी यासाठी नगर विकास विभागाकडे याचिका दाखल केली होती़ त्यानंतर ८ मे रोजी अवर सचिवांनी एक आदेश काढून जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला स्थगिती दिली आहे़ दरम्यान स्थगिती मिळताच पवन आडळकर समर्थकांनी सेलूच्या विविध भागात फटाक्यांची आतषबाजी केली़ जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयानंतर राजकीय घडामोडींना वेग आला होता़ आ़ रामप्रसाद बोर्डीकर, माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर यांनी स्थगिती मिळविण्यासाठी मागील दोन दिवसांपासून मुंबईत तळ ठोकला होता़ प्रतिष्ठेच्या या लढाईत आ़बोर्डीकर गटाची सरशी झाली आहे़ नगरविकास विभागाच्या अवर सचिव प्ऱ कि़ मंगुडकर यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार पवन आडळकर यांच्या सदस्यत्व अपात्रतेच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती देण्यात येत असल्याचे नमुद केले आहे़ दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतर सेलूत राजकीय चर्चेला उधान आले होते़ मात्र आठ दिवसांतच नगराध्यक्ष पवन आडळकर यांना तात्पुरती स्थगिती मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला़ (प्रतिनिधी) समर्थकांत जल्लोष जल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतर माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या समर्थकांनी फटाके फोडले होते़ त्यानंतर पवन आडळकर यांच्या अपात्रतेच्या आदेशाला स्थगिती मिळाल्यानंतर आडळकर गटाच्या कार्यकर्त्यांनी शहरात फटाके फोडले़ आठ दिवसांत दोन वेळा फटाक्यांची आतषबाजीमुळे नागरिकांत चर्चेचा विषय झाला़

Web Title: Suspension of Adalakar disqualification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.