तहसीलदार चित्रक निलंबित

By Admin | Updated: March 19, 2015 23:54 IST2015-03-19T23:39:24+5:302015-03-19T23:54:10+5:30

जालना : भोकरदन तहसील कार्यालयातील अतिरिक्त तहसीलदार आऱव्ही़ चिंत्रक या कार्यालयात नियमित गैरहजर राहत असल्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी एस़ आऱ रंगनायक यांनी निलंबित केले आहे़

Suspended tehsildar painting | तहसीलदार चित्रक निलंबित

तहसीलदार चित्रक निलंबित


जालना : भोकरदन तहसील कार्यालयातील अतिरिक्त तहसीलदार आऱव्ही़ चिंत्रक या कार्यालयात नियमित गैरहजर राहत असल्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी एस़ आऱ रंगनायक यांनी निलंबित केले आहे़
जिल्हाधिकारी रंगनायक यांनी १६ मार्च २०१५ रोजी जाक़्ऱ२०१५/मशाका/आस्था : १ /प्रक़ या आदेशाद्वारे अतिरिक्त तहसीलदार आऱव्ही़चित्रक यांना दिलेल्या निलंबन आदेशात म्हटले आहे की चित्रक या २०१४ पासून सातत्याने अनुपस्थित असल्याबाबत सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी ३१ जानेवारी २०१५ रोजी चित्रक यांना कारणे दाखवा नोटीस दिली होती. तसेच चित्रक या जानेवारी २०१५ पासून ते फेब्रुवारी २०१५ या कालावधीत नियमित गैरहजार असून त्यानी अनुपस्थितीबाबत कोणत्याही प्रकारचे लेखी अथवा तोंडी कळविलेले नसल्याचा अहवाल भोकरदन उपजिल्हाधिकारी तथा परविक्षाधिन तहसीलदार अविशकुमार सोनोने यांनी ३ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविला होता. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रंगनायक यांनी १६ मार्च रोजी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ चे नियम ४ अन्वये चित्रक यांना निलंबित केले. निलंबन काळात मुख्यालय जिल्हापुरवठा अधिकारी कार्यालय जालना येथे ठेवण्यात आले आहे.

Web Title: Suspended tehsildar painting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.