शंकर सिटीकर सेवेतून निलंबित; ‘आयजीं’चे आदेश
By Admin | Updated: December 20, 2015 23:35 IST2015-12-20T23:27:23+5:302015-12-20T23:35:12+5:30
हिंगोली : जिल्हा पोलिस दलांतर्गत गोरेगाव ठाण्यात नेमणुकीस असलेले पो.निरीक्षक शंकर सिटीकर यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

शंकर सिटीकर सेवेतून निलंबित; ‘आयजीं’चे आदेश
हिंगोली : जिल्हा पोलिस दलांतर्गत गोरेगाव ठाण्यात नेमणुकीस असलेले पो.निरीक्षक शंकर सिटीकर यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
सिटीकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचा कार्यभार सांभाळला होता. काही महिन्यांपूर्वी पोलिस अधीक्षक सुधीर दाभाडे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर कैलास कणसे रुजू झाले. त्यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची खांदेपालट करताना पोनि शंकर सिटीकर यांना गोरेगाव ठाण्यात पाठविले. दरम्यान सेवानिवृत्ती जवळ आल्याने विनंतीवरून मुख्यालयात बदलीसाठी सिटीकर यांनी प्रयत्न केले होते. दिवाळीनंतर गोरेगाव ठाणे हद्दीतील सहा ठिकाणी ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम सुरू झाला. त्या दरम्यान कायदा व सुुव्यवस्थेचा प्रश्नही तळणी येथे उद्भवला होता. गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होवून दोन गटातील तणाव वाढलेला असताना अशा स्थितीत प्रकृती अस्वास्थ्याचे कारण दाखवून पोनि सिटीकर हे सिकवर गेले होते. विशेष म्हणजे त्यांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना तोंडी अथवा लेखी सूचना न देताच परस्पर मुख्यालय सोडले होते. याबाबतचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष महानिरीक्षकांकडे पाठविला होता. त्यावरुन पोनि शंकर सिटीकर यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी निघालेल्या आदेशाची प्रत हिंगोलीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना शनिवारी मिळाली.
निषेधाचे निवेदन
हिंगोली : नागपुरातील मातंग समाजाच्या मोर्चावर झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध करून साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे स्मृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना मागणीचे निवेदन दिले. त्यावर अध्यक्ष दत्ता गायकवाड, अनिल खंदारे, कैलास शिखरे, कोंडबा खंदारे यांच्या सह्या आहेत.