वीज महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ निलंबित

By Admin | Updated: May 4, 2016 00:29 IST2016-05-04T00:22:34+5:302016-05-04T00:29:06+5:30

उस्मानाबाद : परंडा तालुक्यातील भोत्रा शिवारात काम करताना वीज सेवकाचा सोमवारी विद्युत धक्क्याने मृत्यू झाला होता़ या प्रकरणात महावितरणकडून करण्यात आलेल्या

Suspended a senior technologist of Power Mahavitaran | वीज महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ निलंबित

वीज महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ निलंबित

उस्मानाबाद : परंडा तालुक्यातील भोत्रा शिवारात काम करताना वीज सेवकाचा सोमवारी विद्युत धक्क्याने मृत्यू झाला होता़ या प्रकरणात महावितरणकडून करण्यात आलेल्या चौकशीत वरिष्ठ तंत्रज्ञ हे प्रथम दर्शनी दोषी आढळून आले असून, कार्यकारी अभियंत्यांनी निलंबित केले आहे़
परंडा तालुक्यातील पिंपळवाडी येथील गणेश मुकुंद आलाट (वय-२४) हा वीज सेवक म्हणून काम करणारा युवक सोमवारी सकाळी भोत्रा शिवारातील विद्युत खांबावर काम करण्यासाठी परमीट घेवून गेला होता़ तो खांबावर चढून काम करीत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने त्याला जोराचा विद्युत धक्का बसला़ त्याला उपचारासाठी परंडा येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले़ या प्रकरणाच्या चौकशीत वीज वाहिनीवरील काम करण्यापूर्वी नियमाप्रमाणे लाईनवर परमीट न घेता हँडल ट्रॅप करण्यात आल्याचे समोर आले होते़ या प्रकरणात प्रथम दर्शनी वरिष्ठ तंत्रज्ञ लक्ष्मण दत्तू गिरी हे दोषी आढळून आल्याने कार्यकारी अभियंत्यांनी त्यांना निलंबित केले आहे़ तर कनिष्ठ यंत्रचालक आय्युब इस्माईल चौधरी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे़
सराटी प्रकरणातही गुन्हा
दरम्यान, तुळजापूर तालुक्यातील सराटी येथील नितीन लक्ष्मण कंटेकूरे या युवकाचाही महावितरणच्या पोलवरील वायर जोडताना विद्युत धक्का लागून मृत्यू झाला होता़ या प्रकरणात दोषी असणाऱ्यांविरूद्धही महावितरण कडून नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात येणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे़

Web Title: Suspended a senior technologist of Power Mahavitaran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.