रॉकेल विक्रेत्याचा परवाना निलंबित
By Admin | Updated: June 22, 2017 23:17 IST2017-06-22T23:13:22+5:302017-06-22T23:17:18+5:30
परभणी : तालुक्यातील धसाडी येथील किरकोळ केरोसीन परवानाधारक डी. एन. शिंदे यांचा किरकोळ केरोसीन परवाना प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील महिंद्रकर यांनी निलंबित केला आहे.

रॉकेल विक्रेत्याचा परवाना निलंबित
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : तालुक्यातील धसाडी येथील किरकोळ केरोसीन परवानाधारक डी. एन. शिंदे यांचा किरकोळ केरोसीन परवाना प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील महिंद्रकर यांनी निलंबित केला आहे.
दक्षता समितीच्या सदस्यांची नावे दर्शविणारा फलक न लावणे तसेच रॉकेल वितरणातील नोंदी व्यवस्थित न ठेवणे, व्हिजीट बुक, तक्रार वही, मासिक शिल्लक साठा आदी बाबतची माहिती व्यवस्थित ठेवली नसल्याच्या कारणावरुन धसाडी येथील किरकोळ केरोसीन परवानाधारक डी. एन. शिंदे यांची परवान्यापोटी जमा असलेली संपूर्ण रक्कम जप्त करुन त्यांचा किरकोळ केरोसीन परवाना निलंबित करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी महेंद्रकर यांनी २२ जून रोजी काढले आहेत.