निलंबित मुख्याध्यापक पोलिसांच्या जाळ्यात
By Admin | Updated: May 8, 2015 00:26 IST2015-05-08T00:20:54+5:302015-05-08T00:26:24+5:30
नळदुर्ग : सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत झालेला निधी परस्पर उचलून अपहार केलेल्या गुन्ह्यातील निलंबित मुख्याध्यापक तब्बल दीड वर्षानंतर पोलिसांच्या जाळ्यात सापडल्याची घटना आज घडली.

निलंबित मुख्याध्यापक पोलिसांच्या जाळ्यात
नळदुर्ग : सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत झालेला निधी परस्पर उचलून अपहार केलेल्या गुन्ह्यातील निलंबित मुख्याध्यापक तब्बल दीड वर्षानंतर पोलिसांच्या जाळ्यात सापडल्याची घटना आज घडली.
तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील तत्कालिन मुख्याध्यापक सुधाकर गणपतराव मुंबरे (५२, रा. तिर्थ खु. ता. तुळजापूर) यांनी सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत आलेला बांधकाम निधी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाची बनावट स्वाक्षरी करून उचलल्याची शिवाय विज्ञान साहित्य खरेदी निधी व विद्यार्थी उपस्थिती भत्ता परस्पर उचलून अपहार केल्याची तक्रार तत्कालिन गटशिक्षणाधिकारी सविता भोसले यांनी नळदुर्ग पोलिसात दिल्याने ३ नोव्हेंबर २०१३ रोजी गुन्हा नोंद झाला होता. दरम्यान मुंबरे हे फरार असल्याने येथील सपोनि फुलचंद मेंगळे यांनी त्यांच्यावर पाळत ठेऊन सहकाऱ्यांमार्फत त्यांना ताब्यात घेऊन तुळजापूर कोर्टापुढे उभे केले असता न्यायालयाने मुंबरे यांना ११ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सदरील घटनेचा अधिक तपास पोउपनि जी. एच. पठाण हे करीत आहेत. (वार्ताहर)