चार स्वस्त धान्य दुकानाचे परवाने निलंबित
By Admin | Updated: July 6, 2017 17:57 IST2017-07-06T17:57:28+5:302017-07-06T17:57:28+5:30
राज्य दक्षता पथकाने केलेल्या तपासणीत बंद आढळुन आलेल्या पाथरी शहरातील चार स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकार पत्र रद्द करुन त्यांचे परवाने निलंबित करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिले.

चार स्वस्त धान्य दुकानाचे परवाने निलंबित
ऑनलाइन लोकमत
परभणी : राज्य दक्षता पथकाने केलेल्या तपासणीत बंद आढळुन आलेल्या पाथरी शहरातील चार स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकार पत्र रद्द करुन त्यांचे परवाने निलंबित करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिले. यासोबतच तहसीलदारांच्या मार्फत स्वतंत्र चौकशी केली जाणार आहे.
पाथरी शहरातील स्वस्त धान्य दुकाना बाबत काही नागरिकांनी अन्न व नागरी पुरवठा विभाग मंत्रालयाकडे केल्या होत्या. या तक्रारीची दखल घेवुन 1 जुलै 2017 रोजी राज्य दक्षता पथकातिल उपनियंत्रक शिधा वाटप तथा सदस्य राज्य दक्षता समिती चे अधिकारी , पाथरीत दाखल झाले होते. पथकात जिल्हा पुरवठा निरीक्षक विवेक पाटील, पुरवठा निरिक्षक एम.एम.देशपांडे, एन. एस. चव्हाण, व्ही. पी. नागरगोजे यांचा समावेश होता. पथकाने केलेल्या पाहणीत खुलेजा नसरीन जोडणी महमद खयुम अ.गफुर, शेर खाँ नुर खाँ जोडणी अरुण शामराव कुलकर्णी, अशोक नामदेव सत्वधर, लक्ष्मण पिराजी वांगीकर यांची दुकाने बंद होती. यामुळे यांची अभिलेखे आणि साठा तपासणी करता आली नाही. या चार ही दुकानाला पथकाने सिल ठोकले.
अभिलेख व शिल्लक साठा पडताळणी करता न आल्याने याप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल महेंद्रकर यांनी जिवन आवश्यक वस्तू कायदा 1955 च्या अनुषंगाने महाराष्ट्र अनुसूचित वस्तुकाड पध्दती द्वारे वाटपाचे नियम आदेश 1988 व अटीचा भंग निष्पन्न झाल्याने चारही दुकानाचे परवाने निलंबित केले.
तहसीलदार यांच्या कडून स्वतंत्र चौकशी
निलंबित करण्यात आलेल्या चारही स्वस्त धान्य दुकानदारांची तहसीलदार मार्फत स्वतंत्र चौकशी केली जाणार आहे, चौकशी नंतर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना आदेशात देण्यात आल्या आहेत.