नायब तहसीलदारासह लिपिक निलंबित
By Admin | Updated: August 7, 2014 02:03 IST2014-08-07T01:53:47+5:302014-08-07T02:03:59+5:30
उस्मानाबाद : जिल्हा प्रशासनाने बुधवारी आक्रमक पवित्रा घेतला. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देताना वरिष्ठांची दिशाभूल केल्याप्रकरणी

नायब तहसीलदारासह लिपिक निलंबित
उस्मानाबाद : जिल्हा प्रशासनाने बुधवारी आक्रमक पवित्रा घेतला. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देताना वरिष्ठांची दिशाभूल केल्याप्रकरणी तुळजापूरचे नायब तहसीलदार जी. यू. वाघे आणि लिपिक पी.यू. कुलकर्णी यांना निलंबित करण्यात आले आहे.
फेब्रुवारी व मार्च महिन्यात गारपिटीमुळे बाधीत झालेल्या क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात आले होते. सर्वेक्षणानुसार ३९ हजार ३४४.६४ हेक्टर जिरायत क्षेत्र तर १ हजार ६८६ हेक्टर बागायत क्षेत्राचे नुकसान झाल्याचे पुढे आले होते. याबरोबरच १ हजार ९०० हेक्टर क्षेत्रावरील फळपिकांचेही आतोनात नुकसान झाले होते. यापोटी नुकसान भरपाई म्हणून मिळालेल्या निधीच्या रक्कमा वाटप करताना कोणत्याही प्रकारची कार्यालयीन कार्यवाही अनुसरली नसल्याचे आता उघड झाले आहे. तहसील कार्यालयांतर्गत येत असलेल्या तलाठ्यांनी नुकसान झालेल्या ग्रारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या क्षेत्रासंदर्भात कोणतीही खात्री न करता, मोघम पंचनामे करुन प्रत्यक्ष नुकसान झालेल्या क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्र नमूद केल्याचे उघड झाले आहे. यामध्ये संबंधित मंडळ अधिकाऱ्यांनीही खात्री केली नाही. तसेच कार्यालयातील तत्कालीन लिपिक कुलकर्णी व नायब तहसीलदार (महसूल) वाघे यांनी मंडळ अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या याद्यांचा ताळमेळ न घेता परस्पर सदरच्या याद्या बँकेस वाटपासाठी पाठविल्या. या याद्याप्रमाणे मंजूर क्षेत्रापेक्षा ३ हजार ८१७.७६ हेक्टर जास्तीचे क्षेत्र निधी वाटपासाठी पाठविले गेल्याचे दिसून आले. हा जास्तीचा निधी गेल्याने तुळजापूर तालुक्यातील मौजे होर्टी, हिप्परगा (ताड) व नंदगाव या गावांना अनुदान वाटपासाठी निधी अपुरा पडला. याप्रकरणी पूर्व कल्पना न देता हेतूपुरस्कर अनुदानाची यादी बँकेस अनुदान वितरित करण्याकरिता देणे. तसेच मूळ गोषवारामध्ये मंजूर क्षेत्र दर्शवून वरिष्ठांची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवत तुळजापूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार वाघे व तत्कालीन लिपिक पी. यू. कुलकर्णी यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या नियम ६ अन्वये तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.