शिक्षण विभागातील लिपिक निलंबित

By Admin | Updated: June 22, 2016 00:56 IST2016-06-22T00:37:20+5:302016-06-22T00:56:15+5:30

औरंगाबाद : काही दिवसांपूर्वी उशिरा रात्री शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांना मोबाईलवर असंवैधानिक भाषेत बोलणाऱ्या कनिष्ठ लिपिकास

Suspended clerk in Education division | शिक्षण विभागातील लिपिक निलंबित

शिक्षण विभागातील लिपिक निलंबित


औरंगाबाद : काही दिवसांपूर्वी उशिरा रात्री शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांना मोबाईलवर असंवैधानिक भाषेत बोलणाऱ्या कनिष्ठ लिपिकास मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी निलंबित केले आहे. निलंबित झालेले कनिष्ठ सहायक पी. बी. चोबे हे दोन महिन्यांनंतर सेवानिवृत्त होणार आहेत, हे विशेष!
झाले असे की, शिक्षण विभागातील जि.प. माध्यमिक शिक्षकांच्या आस्थापनेचे काम चोबे यांच्याकडे आहे. मागील महिन्यात रात्री ११ वाजेच्या नंतर चोबे यांनी शिक्षणाधिकारी मोगल यांना मोबाईलवरून संपर्क साधला. त्यांनी मोबाईलवर अश्लील भाषेत मोगल यांच्याशी बातचित केली. ही बाब मोगल यांना खटकली. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चौधरी यांच्याकडे चोबे यांच्या वर्तनाबद्दल तक्रार केली.
मोगल यांच्या मोबाईलमधील चोबे यांच्या संवादाचे रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चौधरीही संतप्त झाले. त्यांनी महाराष्ट्र जि.प. अधिनियमातील सेवाशर्तीतील वर्तणूक नियम ३ चा भंग केल्यामुळे चोबे यांना तडकाफडकी निलंबित केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी पकडलेल्या समाजकल्याण विभागातील दोघे कर्मचारी व आरोग्य विभागातील एक कर्मचारी लवकरच निलंबित केले जातील. त्यांचा अहवाल प्राप्त झालेला आहे.
दुसरीकडे, समाजकल्याण अधिकारी पदावर लवकरच डॉ. सचिन मडावी रुजू होतील, असेही ते म्हणाले. यापूर्वीही मडावी हे प्रभारी समाजकल्याण अधिकारी म्हणून कार्यरत होते; मात्र विद्यमान समाजकल्याण सभापती यांच्या पतीसोबत शाब्दिक खटके उडाल्यामुळे समाजकल्याण आयुक्तांनी समाधान इंगळे यांच्याकडे या पदाची जबाबदारी सोपवली होती. समाधान इंगळे हे लाच प्रकरणात आरोपी असल्यामुळे पुन्हा सचिन मडावी यांच्याकडे समाजकल्याण अधिकाऱ्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ४
नुकत्याच जिल्हा आणि तालुकास्तरावरून शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत. १५ जूनपासून शाळा सुरू झाल्या असून आणखी काही शिक्षक हे बदली झालेल्या शाळांवर रुजू झालेले नाहीत. यासंबंधीचा अहवाल ‘सीईओं’नी मागविलेला आहे. जे शिक्षक बदली झाल्यानंतर पदस्थापना दिलेल्या शाळांवर रुजू झालेले नसतील, त्यांच्यावर कारवाई अटळ आहे. यापूर्वीही अनेक शिक्षकांनी बदली झाल्यानंतरही संबंधित शाळांवर रुजू न होता सहा-सहा महिन्यांचे वेतन उचलले आहे. ही बाब लक्षात आल्यामुळे ‘सीईओं’नी बदली झालेले शिक्षक, बदलीनंतर संबंधित शाळेवर रुजू झालेले शिक्षक आणि अद्यापही पदस्थापना दिलेल्या शाळांवर रुजू न झालेल्या शिक्षकांचा अहवाल शिक्षणाधिका-ऱ्यांकडून मागविलेला आहे.

Web Title: Suspended clerk in Education division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.