लाचप्रकरणात ‘एएसआय’ निलंबीत
By Admin | Updated: March 28, 2015 00:43 IST2015-03-28T00:20:38+5:302015-03-28T00:43:07+5:30
उस्मानाबाद : दारूबंदीची केस न करण्यासाठी २००० रूपयांचा हप्ता घेताना जेरबंद करण्यात आलेल्या सहाय्यक पोलीस फौजदारास पोलीस अधीक्षकांनी निलंबीत केले आहे़

लाचप्रकरणात ‘एएसआय’ निलंबीत
उस्मानाबाद : दारूबंदीची केस न करण्यासाठी २००० रूपयांचा हप्ता घेताना जेरबंद करण्यात आलेल्या सहाय्यक पोलीस फौजदारास पोलीस अधीक्षकांनी निलंबीत केले आहे़ निलंबनाचे आदेश शुक्रवारी काढण्यात आले असून, एसीबीने मंगळवारी दुपारी सरमकुंडी फाट्यावर कारवाई केली होती़
याबाबत माहिती अशी की, कन्हेरी पारधी पेढीवरील एक महिला व तिच्या पतीने दारूविक्रा व्यवसाय बंद करून मजुरीने कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू केला होता़ मात्र, कन्हेरी गावचे बीट अंमलदार सपोफौ किसन देविदास पवार हे त्या इसमाच्या पत्नीकडे जावून ‘तुम्ही आजूनही दारूविक्री करता, तेव्हा मला महिन्याला दोन हजार रूपये हप्ता द्यायलाच पाहिजे, नाहीतर मी तुमच्यावर दारूबंदीची केस करीन’, असे सांगून दोन महिने २००० रूपये नेले़ तसेच मार्च महिन्यात त्यांना पैसे न दिल्याने त्यांनी पाच हजार रूपयांची मागणीचा तगादा लावल्याची तक्रार ‘एसीबी’कडे दाखल झाली होती़ या तक्रारीवरून एसीबीच्या उपाधीक्षक अश्विनी भोसले यांनी सरमकुंडी फाट्याजवळील एका हॉटेलमध्ये सापळा रचून पाच हजार रूपयांचा मागणी करून २००० रूपये घेतल्यानंतर सपोफौ पवार यांच्याविरूध्द कारवाई केली होती़ याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या घटनेचा अहवाल आल्यानंतर पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी शुक्रवारी सपोफौ किसन पवार यांना निलंबीत केले आहे़ या कारवाईमुळे लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत़ (प्रतिनिधी)