महिलेची छेड काढणारा भामटा अटकेत
By Admin | Updated: June 22, 2014 00:49 IST2014-06-22T00:48:59+5:302014-06-22T00:49:55+5:30
औरंगाबाद : वाळूज औद्योगिक परिसरातील बजाजनगर येथील एका विवाहितेस सतत मोबाईलवर अश्लील बोलून तिची छेड काढणाऱ्या भामट्यास सायबर क्राईम सेलच्या पोलिसांनी जळगाव जिल्ह्यात अटक केली.

महिलेची छेड काढणारा भामटा अटकेत
औरंगाबाद : वाळूज औद्योगिक परिसरातील बजाजनगर येथील एका विवाहितेस सतत मोबाईलवर अश्लील बोलून तिची छेड काढणाऱ्या भामट्यास सायबर क्राईम सेलच्या पोलिसांनी जळगाव जिल्ह्यात अटक केली. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीनुसार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल पाटील ऊर्फ वहाब बशीर पठाण (२९, रा. वाघळी, ता. चाळीसगाव, जि. जळगाव), असे अटक केलेल्या भामट्याचे नाव आहे. अमोल ऊर्फ वहाब हा मागील काही दिवसांपासून बजाजनर येथील रहिवासी विवाहितेचा सतत पाठलाग करीत असे. तिला मोबाईलवर अश्लील बोलून घरासमोर चिठ्ठ्या फेकून पळून जायचा. त्याच्या या वर्तनामुळे सदरील विवाहिता त्रस्त झाली. अखेर तिने पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.