‘त्या’ संच मान्यतेला स्थगिती द्या
By Admin | Updated: December 8, 2014 00:22 IST2014-12-08T00:15:37+5:302014-12-08T00:22:54+5:30
औरंगाबाद : राज्यात मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त करणाऱ्या संच मान्यतेला त्वरित स्थगिती देण्यात यावी, अशी आग्रही मागणी मराठवाडा शिक्षक संघातर्फे करण्यात आली आहे.

‘त्या’ संच मान्यतेला स्थगिती द्या
औरंगाबाद : राज्यात मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त करणाऱ्या संच मान्यतेला त्वरित स्थगिती देण्यात यावी, अशी आग्रही मागणी मराठवाडा शिक्षक संघातर्फे करण्यात आली आहे.
मूल्यांकनामध्ये निकषपात्र ठरलेल्या राज्यातील सर्व शाळांना तातडीने अनुदान अदा करण्यात यावे, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, संच मान्यतेत विद्यार्थी संख्येनुसार वाढीव पदावरील शिक्षकांच्या नेमणुकीस जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून त्वरित मान्यता देण्याबाबत आदेश द्यावेत, मराठी माध्यमाच्या शाळा मोडीत काढणारे शैक्षणिक धोरण रद्द करावे, शासनाच्या धोरणामुळे अतिरिक्त झालेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे तातडीने समायोजन करावे, शिक्षकेतर कर्मचारी कपात करणारा अशैक्षणिक आकृतीबंध रद्द करावा, जिल्हा शिक्षााधिकारी कार्यालयातील दप्तर दिरंगाई थांबवावी.
या मागण्यांसाठी मराठवाडा शिक्षक संघातर्फे मराठवाड्यातील सर्व शिक्षणाधकिारी कार्यालयांसमोर लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले. संघाचे अध्यक्ष पी.एस. घाडगे, कार्याध्यक्षा सुलभा मुंडे, सरचिटणीस व्ही.जी. पवार, तसेच उगलाल राठोड, सुभाष पाटील, विजय देशमुख, शिवाजी गुठे आदींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.