अर्भक असल्याचा संशय; निघाले माकडाचे पिल्लू

By Admin | Updated: July 15, 2014 00:55 IST2014-07-14T23:31:10+5:302014-07-15T00:55:53+5:30

भोकरदन : शहरातील पोलिस कॉलनीच्या पाठीमागे क्रीडासंकुल कार्यालयाच्या समोरील नाल्यामध्ये कोणी तरी दोन महिन्यांचे अर्भक असल्याची चर्चा झाली.

Suspected of being an infant; Go to the monkey | अर्भक असल्याचा संशय; निघाले माकडाचे पिल्लू

अर्भक असल्याचा संशय; निघाले माकडाचे पिल्लू

भोकरदन : शहरातील पोलिस कॉलनीच्या पाठीमागे क्रीडासंकुल कार्यालयाच्या समोरील नाल्यामध्ये कोणी तरी दोन महिन्यांचे अर्भक असल्याची चर्चा झाली. मात्र दोन तासानंतर मात्र बांधलेल्या पोत्यात निघालेले अर्भक नसून त्यामध्ये एका माकडोच पिल्लू असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांसह बघ्याची चांगलीच चकवेगिरी झाल्याचा प्रकार उघड झाला आहे़
१३ जुलै रोजी सकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान शहरातील पोलिस कॉलनीच्या पाठीमागील भागात नाल्याच्या काठावर अज्ञात व्यक्तीने एका पोत्यात अर्भक आणून टाकले असल्याची चर्चा झाली. त्यामुळे पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सटोटे यांच्यासह काही कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्याच बरोबर या ठिकाणी अर्भक कोणाचे असेल हे बघण्यासाठी ४०० ते ५०० नागरिक सुध्दा बघण्यासाठी या ठिकाणी आले होते. मात्र पोत्यातून दुर्गंधी येत असल्याने पोत्याची गाठ सोडण्यासाठी पोलिसांना मजूर शोधेपर्यंत एक ते दोन तास लागले. तो पर्यन्त हे पाप कोणाचे असेल यावर मजुरांनी या पोत्याची गाठ सोडली तर चक्क त्यामध्ये एका मेलेल्या माकडाचे पिल्लू असल्याचे निदर्शनास आले. एकूणच या प्रकाराने पोलिसांसोबतच ग्रामस्थांमध्ये दिवसभर चांगलीच चर्चा रंगली होती. (वार्ताहर)

Web Title: Suspected of being an infant; Go to the monkey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.