सूर्यनारायण ओकतोय आग; पारा ४३ अंशावर
By Admin | Updated: May 20, 2015 00:18 IST2015-05-20T00:13:39+5:302015-05-20T00:18:20+5:30
उस्मानाबाद : मे महिन्याच्या मध्यंतरी उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, मंगळवारी जिल्ह्यात सर्वाधिक ४३़१ अंश सेल्सिअसवर पारा चढला होता़ वाढत्या

सूर्यनारायण ओकतोय आग; पारा ४३ अंशावर
उस्मानाबाद : मे महिन्याच्या मध्यंतरी उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, मंगळवारी जिल्ह्यात सर्वाधिक ४३़१ अंश सेल्सिअसवर पारा चढला होता़ वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे सर्वसामान्यांच्या अंगाची मात्र, लाही-लाही होत आहे़
मागील तीन महिन्यांच्या कालावधीतील उन्हाची तीव्रता पाहता मे महिला सर्वाधिक आग ओकणारा ठरू लागला आहे़ मागील तीन- चार दिवसांपासून उन्हाचा पारा ४० अंशाच्या पुढे सरकला आहे़सोमवारी दिवसभरात कमाल ४१़८ तर किमान २४़७ अंश सेल्सिअस पाऱ्याची नोंद झाली होती़ तर मंगळवारी उन्हाचा पारा थेट ४३़१ अंशावर गेला़ दिवसभरात कमाल ४३़१ तर किमान २६़१ सेल्सिअस तापमानाची नोंद झाली़ वाढत्या उन्हामुळे हैैराण झालेल्या जिल्हावासियांना आता मान्सूनची ओढ आहे़ (प्रतिनिधी)