क्रीडा भारतीतर्फे सूर्यनमस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 23:52 IST2018-01-24T23:51:20+5:302018-01-24T23:52:03+5:30
क्रीडा भारतीतर्फे रथसप्तमीनिमित्त जागतिक सूर्यनमस्कार सोहळा साजरा करण्यात आला. हा सोहळा एमएसएम, बालज्ञान मंदिर, एंजल्स पॅराडाईज, जि.प. कन्या प्रशाला, शिशुविहार हायस्कूल आदी ठिकाणी झाला.

क्रीडा भारतीतर्फे सूर्यनमस्कार
औरंगाबाद : क्रीडा भारतीतर्फे रथसप्तमीनिमित्त जागतिक सूर्यनमस्कार सोहळा साजरा करण्यात आला. हा सोहळा एमएसएम, बालज्ञान मंदिर, एंजल्स पॅराडाईज, जि.प. कन्या प्रशाला, शिशुविहार हायस्कूल आदी ठिकाणी झाला. प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा भारती देवगिरी प्रांतचे अध्यक्ष विजय खाचणे, उपाध्यक्ष सुभाष शेळके, महानगर अध्यक्ष पंकज भारसाखळे, मंडळाचे हेमंत पातूरकर, प्राचार्य शत्रुंजय कोटे, शिवाजीराव जोशी, अशोक यादव, विजय व्यवहारे, संदीप जगताप, चांगदेव औताडे, अंजली टाकळकर, प्रतीक्षा पानसे, तजीन फातेमा, कृष्णा शिंदे, उषा नाईक, यशवंत लिमये, मकरंद जोशी, कालिदास तादलापूरकर, एजाज सिद्दिकी आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन मीनाक्षी मुलीया यांनी केले. आभार मकरंद जोशी यांनी मानले.