निर्मलग्राम पुरस्कारप्राप्त गावांचे आजपासून सर्वेक्षण
By Admin | Updated: September 13, 2014 00:10 IST2014-09-12T23:58:51+5:302014-09-13T00:10:51+5:30
नांदेड: निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त गावांच्या शाश्वता तपासणीसाठी जिल्ह्यातील १८ गावांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे़

निर्मलग्राम पुरस्कारप्राप्त गावांचे आजपासून सर्वेक्षण
नांदेड: निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त गावांच्या शाश्वता तपासणीसाठी जिल्ह्यातील १८ गावांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे़
आजतागायत राज्यातील ९ हजार ५२३ ग्राम पंचायतींना निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला आहे़ जिल्ह्यातील १६९ ग्राम पंचायतींना हा पुरस्कार मिळाला आहे़ यात अर्धापूर तालुक्यातील ८ ग्राम पंचायती, भोकर-१५, बिलोली-९, देगलूर-२, धर्माबाद-४, हदगाव-१३, हिमायतनगर-१३, कंधार-१३, किनवट -१४, लोहा-१३, माहूर-१०, मुदखेड-२५, मुखेड-४, नायगाव-७, नांदेड-१०, उमरी तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे़ सध्या ही गावे स्वच्छतेत शाश्वत आहेत अथवा नाही़ त्यांच्या सवयीत झालेला बदल याबाबत यंत्रणेकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे़ यात नांदेड जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतींचा समावेश आहे़ दिल्ली येथील ९ सदस्यीय शिष्टमंडळ या गावात १३ सप्टेंबरपासून भेट देणार आहे़
या गावांचे होणार सर्वेक्षण
माहूर तालुक्यातील महादापूर, अर्धापूर तालुक्यातील दाभड, भोकर-पांडूर्णा, बोरवाडी, बिलोली-खतगाव, धर्माबाद-पाटोदा खू़ व येवती, हदगाव-रुई, हिमायतनगर-पार्डी, कंधार-बहाद्दरपूरा, मुदखेड-वरदडा तांडा, रोहिपिंपळगाव तांडा, तिरकसवाडी, वैजापूर पार्डी व पिंपळकौठा मगरे, मुखेड-पांडूर्णी, उमरी तालुक्यातील शेलगाव व जिरोणा या ग्राम पंचायतीची तपासणी होणार आहे़ चालू वर्षात जिल्ह्यातील ७४ ग्राम पंचायती निर्मल करण्यात येणार असून स्वच्छतेच्या व्याप्तीसाठी नरेगा आणि निर्मल भारत अभियान कक्षाच्या अभिसरणातून शौचालय बांधण्यात येणार आहेत़