विभागीय व्यवस्थापकांकडून रेल्वेस्थानकाची पाहणी

By Admin | Updated: August 22, 2016 01:11 IST2016-08-22T00:56:23+5:302016-08-22T01:11:46+5:30

जालना : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक डॉ.ए.के.सिन्हा यांनी रविवारी स्थानकाची पाहणी करून स्वच्छता तसेच इतर प्रवशांना सुविधा देण्यासाठी सुधारणा करण्याच्या सूचना

Survey of the railway station by the departmental managers | विभागीय व्यवस्थापकांकडून रेल्वेस्थानकाची पाहणी

विभागीय व्यवस्थापकांकडून रेल्वेस्थानकाची पाहणी


जालना : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक डॉ.ए.के.सिन्हा यांनी रविवारी स्थानकाची पाहणी करून स्वच्छता तसेच इतर प्रवशांना सुविधा देण्यासाठी सुधारणा करण्याच्या सूचना स्थानिक अधिकाऱ्यांना दिल्या.
जालना स्थानक मॉडेल स्थानक असले तरी येथे प्रवाशांना अनेक सुविधांचा सामना करावा लागतो. रविवारी व्यवस्थापक सिन्हा तसेच इतर अधिकाऱ्यांनी स्थानकाची पाहणी केली. यावेळी नवीन स्वयंचलित जिना, कँटिन, स्वच्छता तसेच स्थानक परिसरात असलेली वाहनांची वर्दळ आदींचा अभ्यास केला. हा नियमित तपासणी दौरा असल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले.
रेल्वेस्थानकांत स्वयंचलित जिना तसेच इतर विकास कामे सुरू आहेत. ती कामे गतीने करण्याच्या सूचनाही यावेळी सिन्हा यांनी दिल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, स्थानकातील कँटिनचा प्रश्न बिकट आहे. प्रवाशांना येथे बसण्यासाठी जागा नाही. पावसाळ्यातही गळती लागते. फुडप्लाजाचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी प्रवाशांतून होत असली तरी या कडे दक्षिण मध्य रेल्वेचे दुर्लक्ष आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Survey of the railway station by the departmental managers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.