मराठवाडा वाॅटर ग्रीडच्या सर्वेक्षणास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:07 IST2021-07-14T04:07:07+5:302021-07-14T04:07:07+5:30
उद्घाटनप्रसंगी मंत्री भुमरे म्हणाले की, या योजनेला २८५ कोटी रुपयांचे बजेट मंजूर झाले आहे. या योजनेतून पैठण तालुक्यातील एकही ...

मराठवाडा वाॅटर ग्रीडच्या सर्वेक्षणास सुरुवात
उद्घाटनप्रसंगी मंत्री भुमरे म्हणाले की, या योजनेला २८५ कोटी रुपयांचे बजेट मंजूर झाले आहे. या योजनेतून पैठण तालुक्यातील एकही गाव सुटणार नसून, वडाळा या गावात प्लांट उभा करून जवळपास २०० गावांना यामध्ये जोडण्यात येणार आहे. तालुक़्यातील गावातील वाडी, तांडा वस्तीवरदेखील जायकवाडी धरणाचे पाणी मिळणार असल्याचे सांगितले. कार्यकारी अभियंता अजय सिंह म्हणाले की, दोन महिन्यांत या योजनेचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्यात येणार आहे. यावेळी उपकार्यकारी अभियंता चांदेकर, पाटबंधारे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, कृउबाचे सभापती राजू भुमरे,पंचायत समिती उपसभापती कृष्णा भुमरे, शिवसेना तालुकाप्रमुख अण्णासाहेब लबडे, नंदलाल काळे, दादा बारे, विनोद बोंबले, सोमनाथ परदेशी, विजय गोरे, संतोष सव्वासे, किशोर चौधरी, अरूण काळे, नामदेव खराद, विठ्ठल महाराज चनघटे, अंकुश रंधे, अंकुश बोबडे आदी उपस्थित होते.
फोटो कॅप्शन : मराठवाडा वाॅटर ग्रीडच्या सर्वेक्षणास सुरुवात करताना रोहयोमंत्री संदीपान भुमरे.
120721\img_20210712_123816.jpg
मराठवाडा वाॅटर ग्रीडच्या सर्वेक्षणास सुरुवात करताना रोहयोमंत्री संदीपान भुमरे.