अंनिसच्या वतीने सर्पविज्ञान अभियान

By Admin | Updated: August 8, 2014 00:32 IST2014-08-08T00:12:04+5:302014-08-08T00:32:32+5:30

उस्मानाबाद : नागपंचमी सणाचे औचित्य साधून महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने जिल्ह्यात सर्पविज्ञान अभियान राबविण्यात येत असून,

Surgeon campaign on behalf of Anis | अंनिसच्या वतीने सर्पविज्ञान अभियान

अंनिसच्या वतीने सर्पविज्ञान अभियान



उस्मानाबाद : नागपंचमी सणाचे औचित्य साधून महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने जिल्ह्यात सर्पविज्ञान अभियान राबविण्यात येत असून, याअंतर्गत येथील सत्यभामा शिंदे विद्यालयात सर्पमित्र धम्मपाल बनसोडे यांनी विद्यार्थ्यांना सापांबाबत माहिती दिली.
यावेळी मुख्याध्यापक बी. पी. मोहिते, अंनिसच्या बुवाबाजी संघर्ष समितीचे सचिव सुजीत ओव्हाळ, रवी केसकर, सर्पमित्र राकेश वाघमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सापांबाबत समाजात असलेले गैरसमज दूर होऊन सापांची वैज्ञानिक माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोंचविण्यासाठी हे अभियान राबविले जात आहे. यावेळी विद्यार्थ्यांना पॉवरपॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे सर्पविज्ञान समजावून सांगण्यात आले. जिल्ह्यात आढळणाऱ्या सापांच्या जाती, विषारी-बिनविषारी व निमविषारी साप यावेळी विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.
तसेच साप चावल्यानंतर घ्यावयाचे प्राथमिक उपचार याबाबतही वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.

Web Title: Surgeon campaign on behalf of Anis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.