खंडपीठ वकील संघाच्या अध्यक्षपदी सुरेखा महाजन

By Admin | Updated: July 5, 2014 01:03 IST2014-07-05T00:58:20+5:302014-07-05T01:03:21+5:30

औरंगाबाद : साठ महिला सदस्य असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ वकील संघाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. सुरेखा महाजन या निवडून आल्या.

Surekha Mahajan, President of the Bench Advocate Association | खंडपीठ वकील संघाच्या अध्यक्षपदी सुरेखा महाजन

खंडपीठ वकील संघाच्या अध्यक्षपदी सुरेखा महाजन

औरंगाबाद : साठ महिला सदस्य असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ वकील संघाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. सुरेखा महाजन या निवडून आल्या. ९४६ नोंदणीकृत सदस्य असलेल्या वकील संघाच्या निवडणुकीत तिन्ही उमेदवार महिलाच होत्या, त्यामुळे संपूर्ण न्याययंत्रणेचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ वकील संघाची २०१४-१५ यावर्षाची नवीन कार्यकारिणी निवडण्यासाठी शुक्रवारी ऐतिहासिक निवडणूक झाली. या निवडणुकीत उपाध्यक्षपदी वैशाली शिंदे-मोरे यांनी सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजय संपादन केला.
वकील संघाची कार्यकारिणी निवडण्यासाठी दरवर्षी निवडणूक होत असते. विशेष म्हणजे खंडपीठ वकील संघात कार्यरत असलेल्या महिलांना अध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळावी, यासाठी चार वर्षांतून एकदा अध्यक्षपद हे महिलांसाठी राखीव ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय सहा वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. त्या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवारी करण्यात आली. वकील संघाची २०१४-१५ यावर्षाची कार्यकारिणी निवडण्यासाठी आज मतदान झाले. ही निवडणूक अटीतटीची; परंतु उत्साहात पार पडली.
सहा वर्षांपूर्वीच्या निर्णयाची अंमलबजावणी
खंडपीठ वकील संघात कार्यरत असलेल्या महिलांना अध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळावी, यासाठी चार वर्षांतून एकदा अध्यक्षपद हे महिलांसाठी राखीव ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय सहा वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. त्या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवारी करण्यात आली.
या निवडणुकीत अ‍ॅड. प्रदीप पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
उत्साहात मतदान
खंडपीठातील हॉलमध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. साडेनऊशे सदस्य असलेल्या या संघाच्या ७०० सदस्यांनी दुपारी २ वाजेपर्यंत मतदान केले. तर शेवटच्या एका तासात १७० वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक लढविणारे उमेदवार मतदान कक्षाबाहेर उभे राहून मतदारांना स्मितहास्य करून अभिवादन करीत होते. अनेक मतदार मतदान करून आल्यानंतर उमेदवारांना भेटून तुम्हाला मतदान करून आलो असे सांगत.
ज्युनिअर वकिलांचे प्रश्न मार्गी लावणार
पुरुषप्रधान व्यवसाय म्हणून वकिली व्यवसायाकडे पाहिले जाते. खंडपीठात वकिली करणाऱ्या महिलांची संख्या कमी असली तरी सर्वजणी सक्षमपणे हा व्यवसाय करीत आहेत. पहिली महिला अध्यक्ष होण्याचा बहुमान आपल्याला मिळाल्याने आनंद वाटतो. आपल्या कार्यकाळात ज्युनिअर वकिलांच्या समस्या, वकिलांच्या चेंबरचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यावर आपला भर राहणार आहे.
- अ‍ॅड. सुरेखा महाजन, नवनिर्वाचित अध्यक्ष

Web Title: Surekha Mahajan, President of the Bench Advocate Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.