शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

दहशतीसाठी हिंसाचार, नागपूर पोलिसांच्या मोक्काला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 08:09 IST

मूलभूत अधिकार कायदा पाळणाऱ्यांसाठी

डॉ. खुशालचंद बाहेतीऔरंगाबाद : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा, १९९९ (मोक्का) समाजात किंवा गुन्हेगारी टोळीमध्ये वर्चस्व मिळवण्यासाठी गुन्हे करणाऱ्यांवरही लावता येऊ शकतो, असा निकाल देत सुप्रीम कोर्टाने नागपूर पोलीस आयुक्तांच्या कारवाईवर शिक्कामोर्तब केले आहे. या निर्णयामुळे गुन्हेगारांविरुद्ध मोक्का आणि इतर कडक कायदे लागू होण्याची व्याप्ती वाढणार आहे. २ मे २०१९ रोजी अभिषेक सिंग, अंकित पाली, रोशन शेख आणि इतरांनी नागपूर येथील रेस्टॉरंट मालकाचे अपहरण करून २० लाखांची खंडणी मागितली होती. तब्बल एक वर्षानंतर सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर या गुन्ह्यात मोक्का लावण्यात आला. विशेष न्यायालय आणि उच्च न्यायालयाने अभिषेक सिंगचा अटकपूर्व जामीन फेटाळला. याविरुद्धचे अपील सुप्रीम कोर्टानेही फेटाळले.

नागपूर शहर राज्यात क्रमांक १ वर पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) नवीनचंद्र रेड्डी यांनी गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करताना १२१ विरुद्ध मोक्का आणि १०९ विरुद्ध एमपीडीए हा कडक कायदा लागू केलेली कारवाई राज्यांत अव्वल क्रमांकावर आहे.

सुप्रीम कोर्टात आरोपीचे मुद्दे :आर्थिक लाभ मिळविण्याच्या उद्देशाशिवाय केवळ हिंसाचाराच्या प्रकरणांवर मोक्का  लागू करता येणार नाही.मोक्कामध्ये कठोर तरतुदी आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याचे काटेकोरपणे पालन केलेच पाहिजे. तशी तरतूदच कायद्यात आहे. मोक्काच्या कठोर तरतुदी जाणूनबुजून व चुकीच्या लावल्या आहेत. त्यामुळे आरोपींच्या  मूलभूत अधिकारांवर  बाधा येतेसुप्रीम कोर्टाचा निकालआर्थिक शिवाय  इतर फायदे मिळविण्यासाठी बेकायदेशीर कृत्ये चालू ठेवणेदेखील मोक्का तरतुदीतील “संघटित गुन्हा” आहे. यामध्ये समाजात वर्चस्व किंवा गुन्हेगारी टोळ्यांमध्ये मजबूत पकड निर्माण करण्यासाठी केलेल्या हिंसक कृत्यांचाही समावेश होतो. अशा प्रकरणांमध्ये मोक्का लागू केला जाऊ शकतो.कठोर कायद्याचा वापर करताना सर्व तरतुदींचे काटेकोर पालन केले पाहिजे, यामागे कायद्याचा हेतू हा नाही की त्याची अमलबजावणी  व्यावहारिकदृष्ट्या अशक्य व्हावी. ज्या हेतूने कायदे बनविले ते महत्त्वाचे. स्वतः कायद्याचे व कायदेशीर प्रक्रियेचे  पालन न करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या  मूलभूत हक्कांवर गदा येते, असा दावा करता येणार नाही.

 

टॅग्स :nagpurनागपूरSupreme Courtसर्वोच्च न्यायालय