सुधीर गव्हाणे यांच्या समर्थनार्थ विद्यापीठात धरणे आंदोलन

By Admin | Updated: November 9, 2016 01:34 IST2016-11-09T01:25:59+5:302016-11-09T01:34:42+5:30

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्तविद्या व जनसंपर्क विभागप्रमुख डॉ. सुधीर गव्हाणे यांच्याविरुद्ध विद्यापीठातील निलंबित कर्मचारी सुभाष बोरीकर

Suppression movement in the university in support of Sudhir Ganwane | सुधीर गव्हाणे यांच्या समर्थनार्थ विद्यापीठात धरणे आंदोलन

सुधीर गव्हाणे यांच्या समर्थनार्थ विद्यापीठात धरणे आंदोलन


औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्तविद्या व जनसंपर्क विभागप्रमुख डॉ. सुधीर गव्हाणे यांच्याविरुद्ध विद्यापीठातील निलंबित कर्मचारी सुभाष बोरीकर यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने आज विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयात साम्यवादी नेते मनोहर टाकसाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत डॉ.गव्हाणे यांच्या समर्थनार्थ १० नोव्हेंबरला पोलीस आयुक्तांना निवेदन देत १५ नोव्हेंबर रोजी विद्यापीठात धरणे आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले आहे.
सध्या महाराष्ट्रातील वातावरण लक्षात घेता औरंगाबादचे नाव बदनाम होता कामा नये यासाठी सर्व पुरोगामी, परिवर्तनवादी व लोकशाहीवादी शक्तींनी या आंदोलनात सहभागी व्हावे व अ‍ॅट्रॉसिटीच्या खोट्या तक्रारी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी स्पष्ट भूमिका यावेळी घेण्यात आली. प्राचार्य डॉ. एम.ए. वाहूळ, अ‍ॅड. बी. एच. गायकवाड, साथी सुभाष लोमटे, कॉ. एच. एम. देसरडा, के.ई. हरिदास,साथी अण्णा खंदारे, प्रा. माणिक सावंत, प्रा. प्रकाश सिरसाट, कॉ. राम बाहेती, बाबा गाडे, माधव सावरगावे, संजय शिंदे, कॉ. बुद्धिनाथ बराळ,राम पेरकर,प्रा. फुलसिंग जाधव, जयश्री शिर्के, विद्यार्थिनी सोनाली म्हस्के, अमोल खरात आदींनी आपली मते मांडून बोरीकरसारख्या प्रवृत्तींना अटकाव बसलाच पाहिजे, असे मत मांडले. या बैठकीस रतनकुमार पंडागळे, मंगल खिंवसरा, प्रा.विजय पाथ्रीकर, अ‍ॅड. वैशाली डोळस, देवीदास कीर्तिशाही, कॉ. जनार्दन भोवते, चंद्रभागाबाई दाणे, सतीश सुराणा यांच्यासह बोरीकरविरुद्ध तक्रारी करण्यासाठी अनेक विद्यार्थी- विद्यार्थिनी आलेले होते. प्रारंभी, बुद्धप्रिय कबीर यांनी प्रास्ताविक केले.
विविध संघटनांची पत्रके....
दरम्यान, विविध संघटनांनी आज पत्रके प्रसिद्ध करून डॉ. सुधीर गव्हाणे यांना पाठिंबा जाहीर केला. त्यांच्या समर्थनार्थ ही निवेदने विद्यापीठाचे कुलगुरू, पोलीस आयुक्त व बेगमपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांना सादर करण्यात आली.
मनपाचे माजी सभापती रतनकुमार पंडागळे, प्रा. किसन नरवडे, प्रा. प्रकाश शिरसाट, नगरसेवक गंगाधर ढगे, शांतीलाल दाभाडे व गौतम अडागळे आदींनी बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना निवेदन सादर केले व त्याची प्रत विद्यापीठाच्या कुलसचिवांना सादर केली. प्रा. दिलीप बडे, प्रा. भाग्योदय घाटे, प्रा. ज्ञानेश्वर कांबळे, डॉ. सुखदेव खंदारे, डॉ. प्रकाश डाके, प्रा. समाधान दहिवाल, प्रा. डॉ. ए. पी. सरवदे, राहुल कांबळे, राजकुमार जाधव, डॉ. जी. जी. राजपूत, प्रा. अमोल राजपंखे, प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे, डॉ. फुलचंद सलामपुरे, राजेश मुंढे, प्रा. संजय पाईकराव, डॉ. किशोर सूर्यवंशी, भीमसेन कांबळे, डॉ. जितेंद्र मगर, अमोल दांडगे आदींनी पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करून, डॉ. गव्हाणे यांच्याविषयी जातीयद्वेषातून केलेली तक्रार हा अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा केलेला अनाठायी वापर असल्यामुळे तक्रार गांभीर्याने घेऊ नये असे म्हटले आहे.

Web Title: Suppression movement in the university in support of Sudhir Ganwane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.