पुरवठा अधिकाºयांचे वाईच्या दुकानात ठाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 23:58 IST2017-09-07T23:58:37+5:302017-09-07T23:58:37+5:30
जिल्ह्यात एकूण ७९५ रास्तभाव दुकानदारामार्फत अन्नधान्य व साखर पुरवठा ई-पॉस मशिनव्दारे वाटप करण्याचे प्रमाण अजूनही वाढत नाही. कळमनुरी तालुक्यातील वाई येथील अशा दुकानास प्रत्यक्ष जिल्हा पुरवठा अधिकारी लतिफ पठाण यांनी भेट देत धान्य वाटप केले असता दुकानदारांकडून सांगितल्या जाणाºया कोणत्याच अडचणी नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे.

पुरवठा अधिकाºयांचे वाईच्या दुकानात ठाण
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात एकूण ७९५ रास्तभाव दुकानदारामार्फत अन्नधान्य व साखर पुरवठा ई-पॉस मशिनव्दारे वाटप करण्याचे प्रमाण अजूनही वाढत नाही. कळमनुरी तालुक्यातील वाई येथील अशा दुकानास प्रत्यक्ष जिल्हा पुरवठा अधिकारी लतिफ पठाण यांनी भेट देत धान्य वाटप केले असता दुकानदारांकडून सांगितल्या जाणाºया कोणत्याच अडचणी नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे.
हिंगोली जिल्ह्यात ई-पॉस व्यवहारांचे प्रमाण वाढले होते. ते पुन्हा घटले आहे. काही दुकानांच्या व्यवहारात मात्र सातत्य आहे. त्यामुळे ज्यांना वारंवार सूचना दिल्यानंतरही त्यांच्या व्यवहारात वाढ होत नाही, अशा दुकानांना जिल्हा पुरवठा अधिकारी व तहसीलदारांनी भेटी द्यावयाचे ठरविले होते. त्यानुसार कळमनुरी तालुक्यातील वाई येथील दुकानात पुरवठा अधिकारी लतिफ पठाण व तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी भेट दिली. तब्बल दोन तास त्यांनी तेथे ठाण मांडले होते. त्यात त्यांना दुकानदार ई-पॉसवर अंगठा वेळेत लावत नसल्याचे किंवा व्यवस्थित लावत नसल्याचे आढळले. शिवाय कुटुंबातील जो व्यक्ति धान्य नेण्यास आला त्याच्याच नावावर क्लिक केले जात नसल्याने आधार मॅच होत नसल्यानेही अडचण निर्माण होत होती. या त्रुटी निदर्शनास आणून दिल्यावर सर्व व्यवहार सुरळीत झाल्याचे आढळले. कळमनुरीत स्वस्त धान्य दुकानदारांची बैठक घेऊन मशीन वापरताना सूचनांचे व्यवस्थित पालन करण्यास बजावले आहे.