सूर्य कोपला; जिल्ह्यात पारा ४३ अंशावर
By Admin | Updated: May 1, 2015 00:51 IST2015-05-01T00:35:19+5:302015-05-01T00:51:14+5:30
बीड : जिल्ह्यात तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. गेल्या चार दिवसांच्या कालावधीत कमाल तापमान ४० वरून थेट ४३ अंशावर जाऊन पोहचले आहे. याचा त्रास सर्वांनाच होत आहे.

सूर्य कोपला; जिल्ह्यात पारा ४३ अंशावर
बीड : जिल्ह्यात तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. गेल्या चार दिवसांच्या कालावधीत कमाल तापमान ४० वरून थेट ४३ अंशावर जाऊन पोहचले आहे. याचा त्रास सर्वांनाच होत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी कमाल तापमान ४०.८ तर किमान २४.९ होते. मंगळवारी कमाल तापमान ४२.६ तर किमान २४.६ होते. हेच तापमान बुधवारी कमाल ४३.२ तर किमान २३.१ होते. गेल्या तीन दिवसांमध्ये तापमानामध्ये वाढ होत आहे. चौथ्या दिवशीचे तापमान कायमच राहिले. पारा ४० अंशाहून पुढे गेल्यामुळे वयोवृध्दांसह लहान मुलांचे हाल होत आहेत. घराबाहेर पडल्यास अंगाला अक्षरश: चटके बसल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे.
दिवसभरात प्रचंड ऊन पडत असल्यामुळे रात्रीच्या वेळी जमिनीतून गरम वाफा पडत आहेत. परिणामी अनेकांना रात्री या उकाड्यामुळे झोप येत नाही, असे अनुभव अनेकजण व्यक्त करीत आहेत. आता जर ४३ अंशांच्या पुढे पारा सरकला तर उष्माघाताची शक्यता नाकारता येत नाही. दिवसा मोठ्या प्रमाणावर ऊन पडत असल्यामुळे अनेकजण घराबाहेर पडत नाहीत. दरवर्षी तापमानात वाढ होत असल्याचे आकडेवारीनुसार समोर आले आहे. टोप्या, गमजांची मागणी वाढली आहे. (प्रतिनिधी)