उन्हाचा पार ४१ अंशावर !
By Admin | Updated: April 3, 2016 03:50 IST2016-04-03T03:50:15+5:302016-04-03T03:50:18+5:30
उस्मानाबाद : दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. कडाक्याच्या उन्हामुळे अबालवृद्ध बेजार झाले आहेत. साधारणपणे मागील पाच दिवसांपासून तापमानामध्ये सातत्याने वाढ होवू लागली आहे.

उन्हाचा पार ४१ अंशावर !
उस्मानाबाद : दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. कडाक्याच्या उन्हामुळे अबालवृद्ध बेजार झाले आहेत. साधारणपणे मागील पाच दिवसांपासून तापमानामध्ये सातत्याने वाढ होवू लागली आहे. शनिवारी तर चालू वर्षातील सर्वाधिक ४१.१ अंश सेल्सीअस एवढे तापमान नोंदविले गेले. उष्माघातामुळे अणदूर येथील सव्वा वर्षाची बालिका दगावली आहे.
मार्च महिन्यामध्ये कडाक्याच्या उन्हाळ्याची चाहूल लागली. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात नोंदविल्या गेलेल्या तापमानावरून साधारत: हीच अवस्था आणखी काही दिवस कामय राहील, अशी अपेक्षा होती. परंतु, एप्रिलच्या पहिल्याच दिवसापासून सूर्याने प्रकोप दाखविण्यास सुरूवात केली आहे. शनिवारी शहरातील तापमान ४१.१ अंशावर पोहोंचले. त्यामुळे नियमितपणे घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना चांगलेच चटके जाणवले. पहिल्याच दिवशी सूर्याने आपला प्रकोप दाखवून येणारा काळ याहीपेक्षा त्रासदायक ठरेल, याची जाणीव करून दिली आहे. उन्हाच्या काहिलीचा फटका उस्मानाबादकरांना बसू लागला आहे. सकाळी नऊ वाजल्यापासूनच उन्हाच्या झळा लागत आहेत. दुपारी १ ते २ या वेळेत पार साधारणपणे चाळीशीच्या आसपास पोहोंचत आहे. सायंकाळी उशिरापर्यंत सूर्याच्या प्रकोपाची तीव्रता जाणवत होती. उष्माघातामुळे तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील तनिष्का कांबळे या सव्वा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.