सुमित सरदेशपांडेच्या आयुष्याचा दोर मजबूत!

By Admin | Updated: September 18, 2014 00:41 IST2014-09-18T00:24:08+5:302014-09-18T00:41:42+5:30

औरंगाबाद : बीड बायपास रोडवरील अरुणोदय कॉलनीत राहणाऱ्या सुमित सुशील सरदेशपांडे या १३ वर्षीय मुलाला ब्रेन हॅमरेज झाले

Sumit Saraswantande's life is strong! | सुमित सरदेशपांडेच्या आयुष्याचा दोर मजबूत!

सुमित सरदेशपांडेच्या आयुष्याचा दोर मजबूत!

औरंगाबाद : बीड बायपास रोडवरील अरुणोदय कॉलनीत राहणाऱ्या सुमित सुशील सरदेशपांडे या १३ वर्षीय मुलाला ब्रेन हॅमरेज झाले असून, त्याच्यावर औषधोपचार करण्यासाठी तब्बल १२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे वृत्त बुधवारी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले.
सुमितच्या मदतीसाठी आज तब्बल १६ दानशूर मंडळींनी पुढाकार घेऊन सिग्मा हॉस्पिटलमध्ये ७० हजार रुपये जमा केले.
२८ आॅगस्ट रोजी शाळेत खेळत असताना सुमित सरदेशपांडे याचा अचानक ब्रेन हॅमरेज झाला. त्याच्यावर सिग्मा हॉस्पिटलमध्ये औषधोपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून, डोक्यात पुन्हा रक्तस्राव होऊ नये म्हणून युरोपमधून काही औषधोपचार द्यायचा आहे. या सर्व प्रक्रियेसाठी तब्बल १२ लाख ७० हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सुमितचे वडील सुशील सरदेशपांडे चिकलठाणा एमआयडीसीमध्ये एका कंपनीत कामगार आहेत. त्यांनी आपल्या ऐपतीनुसार आतापर्यंत २ लाख ७० हजार रुपये खर्चही केले. पुढील औषधोपचारासाठी त्यांनी दानशूर मंडळींना मदत करण्याचे आवाहन केले.
बुधवारी यासंदर्भात ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रकाशित करताना सिग्मा हॉस्पिटलमध्ये जाऊन अनेक नागरिकांनी चौकशी केली. काहींनी जागेवरच आर्थिक मदत केली. अशाच पद्धतीने मदतीचा ओघ सुरू राहिल्यास सुमितच्या आयुष्याचा दोर आणखी मजबूत होईल, असा विश्वास त्याच्यावर औषधोपचार करणाऱ्या डॉक्टरांनी आणि वडिलांनी व्यक्त केला.

Web Title: Sumit Saraswantande's life is strong!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.