सुखापुरीसह परिसरात अज्ञात साथीचे थैमान
By Admin | Updated: September 26, 2014 01:19 IST2014-09-26T00:50:22+5:302014-09-26T01:19:31+5:30
सुखापुरी: अंबड तालुक्यातील सुखापुरी परिसरात मागील तीन चार दिवसापासून अज्ञात तापाने थैमान घातले आहे. सुखापुरीतील ७ जण तर करजंगाव वडीकाळा रेवलगाव येथील

सुखापुरीसह परिसरात अज्ञात साथीचे थैमान
सुखापुरी: अंबड तालुक्यातील सुखापुरी परिसरात मागील तीन चार दिवसापासून अज्ञात तापाने थैमान घातले आहे. सुखापुरीतील ७ जण तर करजंगाव वडीकाळा रेवलगाव येथील तीन अशा दहा जणांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच इल्हाडी गावातील दोंघाना डेग्यू सदृश्य ताप असल्याचे जालन्यातील एका खाजगी दवाखान्यात निष्पन्न झाले. ते दोघेही दोन दिवसांपासून तेथे उपचार घेत आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सुखापुरी, लखमापूरी, रेवलगाव, कुकडगाव, कुकडगाव तांडा, रूई, रूई तांडा, करजंगाव, वडीकाळ्या आदी गावातील अनेक रुग्ण तापाने फणफणले आहे.
या गावात तापाच्या साथीसह सर्दी, खोकला, हिवताप आदीं आजाराचे रुग्ण वाढले आहे. काही रुग्ण सरकारी दवान्यात तर काही रुग्ण विविध खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहे.
परिसरातील दहा रूग्ण विविध खाजगी रूग्णालयात दाखल आहेत. त्यात समाधान वाघमारे (वय १७ रा. करजगाव), वाल्मीक पाचफुले (१८ रा. वडीकाळा), भोला राठोड (४० रा.रूई तांडा), सविता भोडवे (२७ रा. रेवलगाव), जयेश जोंधळे (वय ७), तान्हाबाई वाकडे(७५), मंगेश सोहल (३०), गणेश सांगळे (१७), वनिता पटेकर (२८) सर्व रा. सुखापूरी यांचा समावेश आहे. तर इल्हाडी येथील समस सखाराम सानभद्रे (वय ६ ), व उमेर अजिम बागवान (वय ३ वर्ष) हे दोन रूग्ण जालना येथील एका खाजगी रूग्णालयात उपचार घेत आहे. या दोघांनाही डेंग्यू सदृश्य ताप असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले.
सुखापूरी गावात घाणीचे साम्राज्य पसरल्याने डांसाचा पादुर्भाव वाढला आहे.
डासांमुळे गावात मागील आठ दिवसापासून तापाचे रूग्ण वाढले असल्याचे सांगितले. ग्रामपंचायतने गावात धुरफवारणी करणे व गावात स्वच्छता ठवणे गरजे असल्याचे ते म्हणाले. (वार्ताहर)